Sun, May 26, 2019 01:27होमपेज › Pune › पुण्यात दोन आत्‍महत्‍येंच्या घटनांनी खळबळ

पुण्यात दोन आत्‍महत्‍येंच्या घटनांनी खळबळ

Published On: Apr 09 2018 4:52PM | Last Updated: Apr 09 2018 4:52PMपुणे : प्रतिनिधी 

पुणे शहरात उघडकीस आलेल्या दोन आत्महत्येच्या घटनांनी खळबळ उडाली असून, एका नामांकित महाविद्यालयात प्राध्यापिकेने राहत्या घरात गळफास घेतला आहे. तर लॉ कॉलेज रस्त्यावरील अपार्टमेंटमध्ये एका जेष्ठ महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. जेष्ठ महिलेने आत्महत्या केल्याची दाट शक्यता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

सदाशिव पेठेत राहणाऱ्या 34 वर्षीय स्नेहल शहा यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीस आले. दरम्यान त्यांनी आत्महत्या का केली हे समजू शकलेले नाही. मात्र, त्याच्या आई घरी होत्या. त्यांना अंघोळीला पाठवून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा विश्रामबाग पोलिस अधिक तपास करत आहेत.

तर दुसऱ्या घटनेत लॉ कॉलेज रस्त्यावरील राहुल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 86 वर्षीय जेष्ठ महिलेचा मृतदेह मिळून आला आहे. अरुणा धरू (रा. लॉ कॉलेज रस्ता) असे मृत्यू झालेल्या जेष्ठ महिलेचे नाव आहे. सोसायटीतील लोकांना घरातून वास येत असल्याने त्‍यांनी पोलिसांना याविषयीची माहिती दिली. त्यावेळी हा प्रकार समोर आला. अग्निशामकच्या जवानांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता हा प्रकार समोर आला.

त्या एकट्याच राहत होत्या. त्यांचे नातेवाईक कोणी नव्हते. त्यामुळे पोलिसांना अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या घटनेत संशयास्‍पद असे काही नसल्याचे सांगण्यात येत आहे. शवविच्छेदनंतर मृत्यूचे कारण समजेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.दरम्यान या दोन्ही घटना समोर आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

आई-वडील खूप चांगले आहेत...

दरम्यान प्राध्यापिकेने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात "मी स्वत:हून आत्महत्या करीत आहे, याला कोणालाही जबाबदार धरू नये. मी माझ्या आई-वडिलांशी कधी जास्त बोलले नाही. माझे आई-वडील खूप चांगले आहेत, त्यांना त्रास देऊ नये" असे लिहिले आहे.