Mon, Sep 23, 2019 00:59होमपेज › Pune › पुणे : चौघडा वादक निकिताने वेधले लक्ष (Video)

पुणे : चौघडा वादक निकिताने वेधले लक्ष (Video)

Published On: Sep 12 2019 12:48PM | Last Updated: Sep 12 2019 12:49PM
पुणे : प्रतिनिधी 

विसर्जन मिरवणुकीत चौघडे वाजवणारी निकिता सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. निकिता लोणकर ही महाविद्यालयीन तरुणी चौघडा अतिशय लिलया वाजवते. मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीच्या मिरवणुकीत सर्वांच्या कौतुकाच्या नजरा या निकितावर खिळलेल्या असतात. आपल्या पुर्वजांचा पारंपरिक नगारा वादनाची कला ही निकिताने उत्तम प्रकारे आत्मसात केली आहे. राज्यातील पहिली महिला नगारावादक म्हणून तिला ओळखले जाते.

निकिता म्हणते “गणेशोत्सव काळात नागरिक खुप कौतुकाने माझे चौघडा वादन ऐकत असतात. काहीवेळा ते माझ्या सोबत सेल्फी देखील काढतात. माझे वादन पाहून अनेक मुली माझ्यासारखे वादन शिकण्याची इच्छा व्यक्त करतात.

मला नगारा तसेच इतर वाद्ये पूर्णपणे आत्मसात करुन दुसर्‍यांनादेखील शिकवायचे आहे.