Sat, Apr 20, 2019 07:54होमपेज › Pune › आरबीएसकेच्या मुलांवर जनआरोग्यद्वारे उपचार

आरबीएसकेच्या मुलांवर जनआरोग्यद्वारे उपचार

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 24 2017 12:22AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी

आरबीएसकेद्वारे आरोग्य तपासणी केलेल्या मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी व दुर्धर आजारांवरील 104 प्रकारचे उपचार आता महात्मा फुले जनआरोग्य योजना असलेल्या रुग्णालयांमध्ये मोफत होणार आहेत. 
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पूर्ण राज्यभर राबविण्यात येतो. या कार्यक्रमामध्ये 0 ते 18 वयोगटातील शासकीय अंगणवाडी आणि शालेय, आश्रमशाळातील बालकांच्या आरोग्याची तपासणी वर्षातून दोन वेळा करण्यात येते. 

परंतु, यामध्ये काही बालकांना हृदयविकार, दुर्धर आजार किंवा इतर  उपचार व शस्त्रक्रिया करण्याची गरज असते. महात्मा फुले जन आरोग्य योजना असलेल्या  रुग्णालयांतूनही मोफत उपचार करण्यात येणार आहेत. त्यासाठी शासकीय रुग्णवाहिका मुलांची मोफत ने-आण करतील. याबाबत बालकांच्या पालकांना कागदपत्रे गोळा करण्याबाबत आरबीएसकेचे पथक मदत करतील.    याअंतर्गत मेंदूशस्त्रक्रिया, दुभंगलेली टाळू, वाकडे पाय, तिरळेपणा, ह्रदयशस्त्रक्रिया, दंतोपचार यासह 104 प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत.