Fri, Mar 22, 2019 01:30
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › पाच वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार

पाच वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार

Published On: Dec 11 2017 1:33AM | Last Updated: Dec 11 2017 12:23AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

पाच वर्षे वयाच्या एका मुलावर शाळेतील मुलावर उपचार करण्याच्या खोलीत नेऊन एका अनोळखी व्यक्तीने  लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला आहे. हा प्रकार एप्रिल  ते ऑगस्ट 2017  या कालावधीत प्रकार उंड्रीतील एका शाळेत घडला.  मुलाला आई घरी  शिकवत असताना सर्व प्रकार समोर आला आहे. 

याप्रकरणी मुलाच्या आईने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अनोळखी व्यक्तीविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला वानवडी परिसरात राहण्यास आहेत. त्यांना पाच वर्षांचा मुलगा आहे. त्याचे वडील त्यांच्यासोबत राहत नाहीत. त्याला एप्रिलमध्ये उंड्रीतील एका शाळेत प्रवेश मिळाला होता. दरम्यान  मुलगा शाळेतून घरी आल्यावर त्याच्या वागणुकीत महिलेला बदल दिसला. 

त्यानंतर एके दिवशी मुलाला विरुद्धार्थी शब्द शिकवत असताना हा प्रकार समोर आला. महिलेने त्याला विचारले असता शाळेतील एका काकाने त्याच्यासोबत हा प्रकार शाळेतील मुलांना आजारी पडल्यावर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी असलेल्या खोलीत हे दुष्कृत्य केल्याचे समोर आले. त्यानंतर महिलेने कोंढवा पोलिसात तक्रार दिली असून अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोंढवा पोलिस  करत आहेत.