Mon, May 27, 2019 00:39



होमपेज › Pune › पुणे : चऱ्होलीतील पती-पत्‍नीच्या आत्महत्येचे गूढ उलगडले

पुणे : चऱ्होलीतील पती-पत्‍नीच्या आत्महत्येचे गूढ उलगडले

Published On: Jul 02 2018 11:57AM | Last Updated: Jul 02 2018 11:57AM



पिंपरी : प्रतिनिधी 

चऱ्होलीतील नवरा बायकोच्या आत्महत्येचे गूढ उलगडले आहे. ठेकेदाराच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडल्याने उघड झाले. ही घटना २८ जून रोजी चऱ्होली येथे घडली होती. पोलिसांनी ठेकेदारास अटक केली आहे.

भरत हनुमान काळे (२९, रा. दाभाडे वस्ती चऱ्होली) असे अटक केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. मुक्ता उत्तम सूर्यवंशी (वय ३१) आणि उत्तम तुकाराम सूर्यवंशी (वय ३३) या नवरा बायकोने आत्महत्या केली होती. 

दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम सूर्यवंशी हे आरोपी भरत काळे यांच्याकडे कामाला होते. काळे यांनी त्यांच्या मजुरीचे पैसे न दिल्याने त्यांच्यामध्ये भांडण झाले होते. तसेच केबलचे बंडल चोरल्यावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. आरोपी काळे हा मुक्ता सूर्यवंशी यांना देखील त्रास देत होता. या सर्व त्रासाला कंटाळून सूर्यवंशी दाम्पत्याने २८ जून रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दिघी पोलिस तपास करीत आहेत