Mon, Apr 22, 2019 11:39होमपेज › Pune › रेल्वे मंत्रालयाला पडला पुण्याचा विसर

रेल्वे मंत्रालयाला पडला पुण्याचा विसर

Published On: Feb 05 2018 9:47AM | Last Updated: Feb 05 2018 1:09AMपुणे : निमिष गोखले 

केंद्रिय अर्थसंकल्प सादर होऊन तब्बल चार दिवस उलटून गेले तरीही रेल्वे मंत्रालयाकडून पुण्यासंदर्भात कोणत्या तरतूदी करण्यात आल्या आहेत, या बाबत मुंबई मुख्यालयाला काहीच कळविण्यात आले नसून, रेल्वे खात्याला पुण्याचा विसर पडल्याचेच यावरून दिसते आहे. गतवर्षीप्रमाणेच या वर्षीही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वेसाठीच्या तरतुदींचा उल्लेख आपल्या भाषणात केला; मात्र तो अतिशय त्रोटक होता. त्यातून पुणे शहर व जिल्ह्यासाठी या रेल्वे बजेटमधून नेमके काय मिळाले ते स्पष्ट झालेच नव्हते. यामुळे सार्‍यांचेच लक्ष रेल्वे मंत्रालयाकडून सादर होणार्‍या पिंक बुक या अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती असणार्‍या पुस्तिकेकडे लागले आहे.  

या पिंक बुकला उशीर होत असल्याने पुण्याला यंदाच्या वर्षी नव्या रेल्वे, नवे प्रकल्प, आदी गोष्टी मिळाल्याच नाहीत, अशा चर्चांना ऊत आला आहे.दरम्यान, रेल्वे अर्थसंकल्प वेगळे सादर न करण्यामागे मोठे कट-कारस्थान असून, रेल्वेची संपत्ती विकणे आदी गोष्टींचा हिशेब लोकांसमोर येऊ नये म्हणून, हेतूपुरस्सर केलेला हा प्रयत्न आहे, असे मत रेल्वेतज्ज्ञांनी मांडले आहे.  गेल्या तीन वर्षांपासून पुण्यासाठी असणारे प्रस्ताव, त्यांचे काम कुठपर्यंत आले, याची सविस्तर माहिती रेल्वे प्रशासनाने सादर करून यंदाच्या वर्षी पुण्यासाठी कोणत्या प्रकल्पांची तरतूद करण्यात आली आहे, हे सांगावे. त्याला विलंब होत असल्याने पुणेकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे,’ असे मत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी व्यक्त केले आहे. यांना असतो अधिकार

रेल्वेचे कोणते प्रकल्प कोणत्या विभागासाठी देण्यात यावेत, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार, रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा अश्‍विनी लोहार, सचिव रंजने सहाय, त्याचबरोबर सूचना व प्रसारक निर्देशक वेदप्रकाश यांच्यासह रेल्वेमंत्री पियुष गोयल, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा व राजेन गोहाई यांना आहे. रेल्वेचे एकूण 17 झोन असून, 73 विभाग आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनादेखील पुणे विभागाला कोणत्या प्रकल्पांची, तरतुदींची गरज आहे, हे रेल्वे मंत्रालयाला थेट पत्राद्वारे कळविण्याची परवानगी आहे.