Mon, Jan 21, 2019 02:44होमपेज › Pune › चंपाषष्ठीचा उत्सव शहरात उत्साहात साजरा

चंपाषष्ठीचा उत्सव शहरात उत्साहात साजरा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा चंपाषष्ठीचा उत्सव शहरात उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी  सर्वत्र येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषात भंडारा उधळून भाविक मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेत होते. 

मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. यास खंडोबाचें नवरात्र असें म्हणतात. जेजुरीसह संपूर्ण महाराष्ट्रात हा  उत्सव मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन ‘मणी’ व ‘मल्ल’ दैत्यांचा वध केला. त्यामुळे या दिवसाला विशेष पौराणिक महत्त्व आहे. आजच्या दिवशी वांग्याचे भरीत - भाकरीचे नैवेद्य  दाखवण्याची  पद्धत आहे.

शहरातील कडेपठार सेवा मंडळ, श्रीम्हाळसाकांत देवस्थान खंडोबा मंदिर अशा विविध ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी रीघ लावली होती.या निमित्ताने दिवसभर षोडोपचार पूजा, अभिषेक,भजनांचा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांना प्रसाद वाटण्यात  आला.