Fri, Apr 19, 2019 12:13होमपेज › Pune › गाड्या जळीतकांडातील आरोपींना सिंहगड रोड पोलिसांकडून अटक

गाड्या जळीतकांडातील आरोपींना सिंहगड रोड पोलिसांकडून अटक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

दोन दिवासापूर्वी (२९/०३/२०१८)  रात्री ०२.३० च्या सुमारास धायरी मधील रायकर नगर भागातील हसन अब्दुल जमील शेख यांच्या मालकीची ऑडी कंपनीची क्यु ५ मॉडेल गाडी व बाजुस असलेली होंडा सीटी या गाड्या अज्ञात इसमांनी पेट्रोल टाकून पेटवल्या होत्या. या बाबत सिंहगड पोलिस स्थानकामध्ये भा.द.वि.कलम ४३५,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयीत व्यक्ती दिसून आल्या होत्या. या व्यक्तींचा शोध घेत असताना या दोन अनोळखी व्यक्ती रायकरमळा, धायरी गाव पुणे स्मशानभूमीजवळ थाबल्याची माहिती मिळाली.  त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यामध्ये श्रीकांत सतिष थोपटे (वय २५ रा प्रयाग रेसीडेन्सी धायरी पुणे) आणि अक्षय विष्णु मोरे (वय २२ रा चव्हाणनगर धनकवडी पुणे) अशी ताब्यात घेलेल्याची नावे आहेत. 

त्यांच्याकडे अधिक तपास केला असता, आरोपी थोपटे याचे अभिजीत उर्फ बटर्या गाडे याच्याबरोबर वाद होते. आरोपीनी अभिजीत उर्फ बटर्या गाडे याच्यावरचा राग काढण्यासाठी हसन शेख यांची दोन्ही कार पेटवून दिल्या. यामागे हसन शेख यांनी अभिजीत उर्फ बटर्या गाडे याच्यावर संशय घेवुन त्याचेशी भांडण करावे असा  हेतु होता. 

या घटनेचा तपास अपर पोलिस आयुक्त,  रविंद्र सेनगावकर, पोलिस उपआयुक्त परीमंडळ -२,  प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग डॉ शिवाजी पवार, वरीष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु जगताप, मसपोनि गडकरी, पोलिस उपनिरीक्षक गिरीष सोनवणे व तपास पथकातील कर्मचारी यशवंत ओंबासे, सुनिल पवार, दयानंद तेलंगेपाटील, दत्ता सोनवणे, प्रशांत काकडे, राहुल शेडगे, मयुर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला यांनी केला.
 

Tags : crime, pune police, burning imported car case dhayari, two arrested 


  •