होमपेज › Pune › थेरगावमध्ये खासगी बस जळून खाक

थेरगावमध्ये खासगी बस जळून खाक

Published On: Apr 18 2018 6:32PM | Last Updated: Apr 18 2018 6:32PMवाकड : वार्ताहर

थेरगाव येथील क्रांतीवीरनगर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसने अचानकपणे पेट घेतला. ही घटना सायंकाळी पावणे पाच वाजता घडली. 

अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीने रुद्ररूप धारण केल्यामुळे बस पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी बसचे मोठे नुकसान झाले आहे. ही बस एका खासगी कंपनीची असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकले नाही.