Sun, Aug 18, 2019 15:21होमपेज › Pune › पुणे : बिल्डर शहा यांच्या खूनप्रकरणी ठाण्यातून एकाला अटक

पुणे : बिल्डर शहा यांच्या खूनप्रकरणी ठाण्यातून एकाला अटक

Published On: Jan 23 2018 1:30PM | Last Updated: Jan 23 2018 1:30PMपुणे : प्रतिनिधी

प्रभात रस्त्यावरील बिल्डर देवेंन शहा यांच्या खूनप्रकरणी डेक्कन पोलिसांनी ठाण्यातून एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून राहुल शिवतारे व रवि चोरगे यांनी शहांवर गोळ्या झाडलेले दोन पिस्तूल तसेच काडतूसे जप्त केली आहेत. राहुल शिवतारेच्या ओळखीचा असून, ठाण्यात गेल्यानंतर त्यांनी हे पिस्तूल त्याच्याकडे ठेवल्याचे समोर आले आहे. त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सुरेंद्र शामकेर पाल (वय ३१, रा. आझादनगर, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, रविवारी  रविंद्र सदाशिव चोरगे (वय ४८, रा. अमृतनगर, माणिकबाग, सिंहगड रोड) याला पोलिसांनी अटक केली. राहुल चंद्रकांत शिवतारे (वय ४१, रा. वडगाव बुद्रुक) याचा अद्यापही पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही.