Tue, Apr 23, 2019 07:51होमपेज › Pune › ‘बीएसएनएल’ कंपनी संपवण्याचा सरकारचा घाट

‘बीएसएनएल’ कंपनी संपवण्याचा सरकारचा घाट

Published On: Dec 11 2017 1:33AM | Last Updated: Dec 11 2017 12:51AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असलेली भारत संचार निगम लिमिटेड कंपनी संपविण्याचा घाट सरकारने घातला आहे, असा आरोप करीत देशातील बीएसएनएलचे कर्मचारी 12 आणि 13 डिसेंबर रोजी संपावर जाणार आहेत, अशी माहिती युनियन असोसिएशन ऑफ बीएसएनएलच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. 

सरकारने ’बीएसएनएल’च्या कामकाजाची विभागनी करून ब्राँडबँड आणि टॉवर अशा दोन नवीन कंपन्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दूरसंचार सेवा सुरू झाल्यानंतर देशाच्या कानाकोपर्‍यात ’बीएसएनएल’ची सेवा पोचली. मात्र, देशात खासगी दूरसंचार कपन्यांना मान्यता देण्यात आल्यानंतर मोबाईलसेवेमध्ये मोठी क्रांती झाली. खासगी मोबाईल कंपन्यांनी वेगवेगळे अमिष दाखवून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतले. परंतु, सरकारी कंपनी असूनही बीएसएनएलला जमले नाही. 

सरकारने वेगळ्या दोन कंपन्या सुरू करून ’बीएसएनएल’चे विभाजन करण्याचा घाट घातला आहे. कालांतराने या दोन्ही कंपन्या उद्योजकांना विकण्याचा प्रयत्न होऊ शकतो. सरकारच्या  या निर्णयामुळे असंख्य ग्राहक विश्‍वासपात्र दूरसंचार सेवेला मुकणार असल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या सरकारच्या निर्णयाविरोधात ’बीएसएनएल’ कर्मचार्‍यांनी दि. 12 आणि 13 डिसेंबरला संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

जे ग्राहक ’बीएसएनएल’ची सेवा घेतात त्यांची सपांच्या काळात गैरसोय होणार असून त्याविषयी संघटनेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. या संपात शहर आणि जिल्ह्यातील ’बीएसएनएल’ईयू, एनएफटीई, एसएनईए, एआयबीएसएनएलइए आणि एसईडब्ल्यूए संघटनेचे सदस्य सहभागी होणार आहेत. या निवेदनावर एम.आय. जकाती, डी. एस. जगदाळे, भरत सोनावणे, एस. आर. दिनकर आणि एस.एन. शिंदे यांची स्वाक्षरी आहे.