Thu, Apr 25, 2019 13:28होमपेज › Pune › लाच घेताना आरोग्‍य निरीक्षकासह वैघकीय अधिकारी जाळ्‍यात 

लाच घेताना आरोग्‍य निरीक्षकासह वैघकीय अधिकारी जाळ्‍यात 

Published On: Mar 13 2018 5:04PM | Last Updated: Mar 13 2018 5:04PMपुणे : प्रतिनिधी

पुण्यातील ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयातील आरोग्य निरीक्षकासह एका वैद्यकीय अधिकाऱ्याला एका डॉक्टरकडून 10 हजार रूपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. मधुकर निवृत्ती पाटील (वय 53) व संदीप जयराम धेंडे (40) असे पकडण्यात आलेल्या आरोग्य निरीक्षक व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाव आहे. 

तक्रारदार हे डॉक्टर असून, त्यांचे रूग्णालय आहे. रूग्णालयाची नोंदणी नूतनीकरण करण्यासाठी पाटील यांनी तक्रार दार यांच्याकडे लाच मागितली. आज पाटील व धेंडे हे तक्रारदराकडून 10 हजार रूपयांयांची लाच स्‍विकारत असताना त्‍यांना  एसीबीने रंगेहात पकडले.