Sun, Jan 20, 2019 08:18होमपेज › Pune › पुणे जिल्ह्यामधील जमावबंदी हटवली

पुणे जिल्ह्यामधील जमावबंदी हटवली

Published On: Jan 05 2018 1:23AM | Last Updated: Jan 05 2018 12:58AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

कोरेगाव भीमा येथे निर्माण झालेल्या कायदा व सुव्यस्थेच्या पार्श्‍वभूमीवर शिरूर परिसरात जमावबंदीचे आदेश जारी केले होते. मात्र, परिस्थिती सुधारल्यामुळे जमावबंदी हटविण्यात आल्याचे जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकरी राजेंद्र मुठे यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा येथील विजयीस्तंभास 1 जानेवारी रोजी 200 वर्षे पूर्ण झाले. या निमित्ताने अभिवादनासाठी सुमारे 3 लाखांपेक्षा अधिक अनुयायी येण्याची शक्यता प्रशासनाला होती. मात्र, आलेल्या नागरिकांवर एका गटाने दगडफेक केल्याची घटना घडली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कलम 144 लागू केले होते. तसेच या परिसरातील इंटरनेट सेवा विस्कळीत करण्यात आली होती. 

बुधवारी सायंकाळी राज्यातील बंद मागे घेतल्यानंतर परिस्थिती सुधारली असून, सध्या कोरेगाव भीमा परिसरात संपूर्ण शांतता आहे. त्यामुळे जमावबंदीचा मागे घेण्यात आली आहे, असे मुठे यांनी सांगितले.