Fri, Apr 26, 2019 15:19होमपेज › Pune › पुणे : सराईत वाहनचोरांकडून ६ दुचाकी जप्त 

पुणे : सराईत वाहनचोरांकडून ६ दुचाकी जप्त 

Published On: Jan 28 2018 4:59PM | Last Updated: Jan 28 2018 4:59PMपुणे : प्रतिनिधी 

पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईताला भारती पोलिसांच्या पथकाने अटक केली.  त्यांच्याकडून सव्वा दोन लाख रुपये किंमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. 

रविंद्र उर्फ रव्या बाळासाहेब धोत्रे (26, मु. पो. रांजे, ता. भोर, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. रविंद्र धोत्रे हा रेकॉर्डवरील सराईत असून, त्याच्यावर यापुर्वी सिंहगडरोड, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक परिसरात गस्त घालत असताना पोलिस कर्मचारी कृष्णा निढाळकर व सर्फराज देशमुख यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वाहन चोरी करणारा सराईत वाहनचोर रव्या धोत्रे हा स्वामी नारायण मंदिराजवळील सर्विस रोडवर व्हिलेज हॉटेल येथे येणार आहे. त्याच्याकडे चोरीची दुचाकी आहे. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा लावून त्याला पकडले. त्यावेळी त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने भारती विद्यापीठ पोलिसांच्या हद्दीतून व पुणे ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गोगलवाडी शिंदेवाडी येथून दुचाकी चोरल्या असल्याचे कबूल केले. त्याच्याकडून पल्सर, ड्रिम युगा, 2 स्प्लेंडर, यामहा, पॅशन अशा दोन लाख 20 हजार रुपये किंमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील 5 तर राजगड पोलिसांत दाखल 1 अशा सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.