Thu, Jun 04, 2020 06:35होमपेज › Pune › पुणे : पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण, दोघांविरोधात गुन्हा

पुणे : पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण, दोघांविरोधात गुन्हा

Last Updated: Mar 28 2020 4:37PM
बारामती : पुढारी वृत्तसेवा

क्रिकेट खेळू नका, असे सांगणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला बॅट आणि दगडाने मारहाण केल्याप्रकरणी काटेवाडी (ता. बारामती) येथील दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. तालुका पोलिसांनी सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण, सरकारी कामकाजात अडथळा यासह कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला. दयानंद भिसे आणि शशिकांत भिसे (रा. काटेवाडी, ता. बारामती) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

जखमी पोलिस कर्मचारी पोपट शशिकांत कवितके यांनी याबाबत फिर्याद दिली. शुक्रवारी दि.२७) रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता काटेवाडीत सोमय्या यांच्या मोकळ्या प्लॉटिंग जमिनीत ही घटना घडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु असल्याने कवितके यांना काटेवाडी येथे पेट्रोलिंग ड्युटी होती. 

शुक्रवारी सकाळी न्यायालयातील काम बघून ते दुपारी काटेवाडी येथे गस्तीसाठी गेले. सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास काही युवक रिकाम्या प्लॉटिंग मैदानात क्रिकेट खेळताना आढळून आले. एकत्र येवू नका, घरात बसा, क्रिकेट खेळू नका, असे कवितके यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला असताना आरोपींनी स्टम्पने त्यांच्या तोंडावर मारहाण केली. जखमी अवस्थेतील कवितके यांना आनंद मोरे यांनी दवाखान्यात नेले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.