Tue, Nov 13, 2018 03:46होमपेज › Pune › बारामतीच्या कचरा डेपोला पुन्हा आग

बारामतीच्या कचरा डेपोला पुन्हा आग

Published On: May 08 2018 3:34PM | Last Updated: May 08 2018 3:34PMबारामती : प्रतिनिधी 

बारामती शहरातील कचरा डेपोला आज मंगळवारी दुपारी पुन्हा अचानक आग लागली. या आगीमुळे आकाशात धूरांचे लोट निर्माण झाले. 

वारंवार लागणार्‍या या आगीमुळे लगतच्या निवासी इमारतीतील नागरीकांना श्वास घेणेही अशक्य होवून बसले आहे. आग लागल्यानंतरही पालिकेकडून यासंबधी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. कचरा डेपो पेटण्याची तीन दिवसातील दुसरी घटना आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांकडून पालिकेच्या कारभारावर तीव्र नापसंती व्यक्‍त करण्यात येत आहे