Mon, Apr 22, 2019 05:47होमपेज › Pune › स्तन कर्करोग जागृती कार्यक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

स्तन कर्करोग जागृती कार्यक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Published On: Feb 12 2018 2:04AM | Last Updated: Feb 12 2018 2:04AMपुणे : प्रतिनिधी

दोन हजारपेक्षा जास्त महिलांनी आज स्तनाच्या कर्करोगाविषयीची सलग 44 मिनिट जनजागृती व्याख्यान ऐकणे आणि सलग सहा मिनिटे स्तनाच्या कर्करोगाचे प्रतिक असलेल्या गुलाबी रंगाचे नेलपॉलिश बोटांना लावण्याचा विश्वविक्रम रविवारी केला. या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या कार्यक्रमात 1956 महिलांनी नेलपॉलिश वण्याच्या तर 1919 महिलांनी स्तन कर्करोगावरील मार्गदर्शन ऐकण्याचा कार्यक्रमात सहभाग घेतला. पुण्यातील ओवायई (ओपन युअर आईज) फाऊंडेशनतर्फे  प्रशांती कॅन्सर केअर मिशन आणि पॉलिकॅब केबल्स यांच्या सहयोगाने रविवारी येरवडा येथील डेक्कन महाविद्यालयाच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा विश्वविक्रम झाला.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या निरीक्षण अधिकारी लुसिया सिनीगॅग्लियसी यांनी या दोन्हीही विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र ओवायई फाउंडेशनच्या पदाधिकार्‍यांकडे सुपूर्त केले. याप्रसंगी प्रशांती कॅन्सर सेंटरच्या लालेह बुशेरी, फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सिमरन जेठवानी, आंतरराष्ट्रीय संचालिका लीला पुनावाला, उपाध्यक्षा जानकी मल्होत्रा, सचिव रेश्मा सराफ आदी उपस्थित होते. गेल्या अनेक महिन्यांपासून या उपक्रमाची तयारी सुरु होती. शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, संस्था आणि छोट्या छोट्या गटातून महिला यामध्ये सहभागी झाल्या.

दोन हजारपेक्षा अधिक महिलांनी यात सहभाग घेतला. लुसिया सिनीगॅग्लियसी म्हणाल्या की, जवळपास दोन हजार महिलांनी एकाचवेळी स्तन कर्करोगाविषयी जाणून घेत जागृती केली. असा उपक्रम जगभरात पहिल्यांदाच झाला आहे. कर्करोगातून बर्‍या झालेल्या पाच महिलांचे अनुभव ऐकताना अनेकींचे चेहरे भावूक झाले. या उपक्रमात सहभागी झालेल्या महिलांना प्रशांती कॅन्सर केअर सेंटरमध्ये जाऊन मेमोग्राफी व इतर तपासण्या करता येणार आहेत.