Thu, Jul 18, 2019 10:57होमपेज › Pune › पुणे : एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेले ७४ लाख घेऊन चालक फरार 

पुणे : एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेले ७४ लाख घेऊन चालक फरार 

Published On: Jan 31 2018 6:20PM | Last Updated: Jan 31 2018 6:20PMवाकड : वार्ताहर 

एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली ७४ लाखांची रोकड घेऊन चालक फरार झाला आहे. ही घटना बुधवार ( दि .३१ ) दुपारी एकच्या सुमारास कोकणे चौक येथे घडली.

याप्रकरणी चालक रणजीत धर्मराज कोटेकर याच्यावर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोकणे चौक येथील ऍक्सिस बँकेच्या एटीएममध्ये रोकड भरण्याचे कंत्राट ब्रीक्स या कंपनीस देण्यात आले आहे. या कंपनीची मोटार ( एमएच१४ सीएक्स ५७११) नेहमीप्रमाणे बँकेसमोर आली. मोटारीतील चौघेजण खाली उतरल्यानंतर चालक रोकड असलेली मोटार घेऊन फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून बँकेचे सीसीटीव्ही फुटेज  तपासण्याचे काम सुरू आहे.