Tue, Apr 23, 2019 14:03होमपेज › Pune › पंतप्रधान आवाससाठी ‘पीएमआरडीए’कडे अर्ज करता येणार

पंतप्रधान आवाससाठी ‘पीएमआरडीए’कडे अर्ज करता येणार

Published On: Jan 09 2018 1:35AM | Last Updated: Jan 09 2018 12:47AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

सर्वांना घर मिळावे म्हणून सुरु करण्यात आलेली प्रधानमंत्री आवास योजना पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) वर्ग करण्यात आली आहे. या याजनेत घर घेण्याची इच्छा असणार्‍यांसाठी ‘पीएमआरडीए’च्या संकेतस्थळावर 15 जानेवारीपासून योजनेचे अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. गित्ते म्हणाले, शहरात 2022 पर्यंत 2 लाख 19 हजार 75 घरे बांधण्याचे उद्दीष्ट आहे. मात्र, त्यातील केवळ 10 हजार 496 घरांनाच मंजूरी मिळाली आहे. गरजूना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे मिळतील असे शहरात 167 प्रकल्पांचे काम सुरु आहे. घर घेण्याची इच्छा असणार्‍यांंनी ‘पीएमआरडीए’च्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. पुण्यात घरांची मागणी लाखात असून सध्या केवळ काही हजारांमध्येच घरे तयार होत आहेत.

त्यामुळे घर उभारणीला वेग देवून या योजनेंतर्गत पुढील चार वर्षात दोन लाखांहून अधिक घरे उभी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगत गित्ते म्हणाले, पूर्वी म्हाडाकडे घरांसाठी अर्ज आले असतीत तर संबंधित अर्ज ‘पीएमआरडीए’डे घेतले जातील. तसेच बँकेचे कर्ज, शासनाचे अनुदान याबाबत मार्ग दर्शन करण्यासाठी मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे, असेही गित्ती यांना सांगितले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दुर्बल घटक व अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना  30 ते 60 चौरस मीटर एवढया क्षेत्रफळापर्यंत नवीन घर बांधण्यासाठी किंवा जुन्या घराची वाढ करण्यासाठी बँकांमार्फत अत्यल्प व्याज दराने कर्ज मिळणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून 2.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे ज्यांच्या नावावर घर नाही, अशा नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, याबाबत जागृती केली जात असल्याचे गित्ते यांनी सांगितले.