Mon, Feb 18, 2019 18:17होमपेज › Pune › शिक्षकांवर शालाबाह्य कामांची जबाबदारी नको

शिक्षकांवर शालाबाह्य कामांची जबाबदारी नको

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

शैक्षणिक गुणवत्ता आणि विस्ताराचा विचार करता नवीन पिढी घडविण्यासाठी शिक्षकांना मुक्तपणे काम करता आले पाहिजे. शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णयाची गरज असून, शिक्षक भरती बंद करण्याचा निर्णय अतिरेकी आहे. त्याबरोबरच ज्ञानदानाचे काम करणार्‍या शिक्षकांवर शालाबाह्य कामांची जबाबदारी टाकणे योग्य नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (दि. 29) व्यक्त केले आहे.

पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभात पवार बोलत होते. या वेळी आ. दत्तात्रय सावंत, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे, पुणे विभागाचे प्रभारी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष महेंद्र गणपुले आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

पटसंख्या हा दुर्लक्षित करण्यासारखा भाग नाही. शहरी भाग आणि उजाड, आदिवासी पाड्यांसाठी पटसंख्येचा एकच निकष लावला तर दुर्गम भागातील मुलांना शिक्षणच मिळणार नाही. त्यामुळे शाळा बंद धोरणात बदल झाला पाहिजे.
 


  •