Tue, Apr 23, 2019 05:39होमपेज › Pune › रुग्णवाहिकाच व्हेंटिलेटरवर

रुग्णवाहिकाच व्हेंटिलेटरवर

Published On: Dec 11 2017 1:33AM | Last Updated: Dec 11 2017 12:54AM

बुकमार्क करा

ज्ञानेश्‍वर भोंडे

पुणे ः शिक्षणांचे माहेरघर, सेवानिवृत्तांचे, सायकलींचे, आयटी हब, अशी ओळख निर्माण करणार्‍या पुणे शहराची आता वाहतूक कोंडीचे शहर म्हणूनही ओळख निर्माण होत आहे. कारण, दररोज तब्बल अकराशे वाहने रस्त्यावर येत आहेत. त्यातच अरुंद रस्त्यांमुळे रुग्णवाहिकांचा श्‍वास वाहतूक कोंडीत गुदमरत असल्याची गंभीर तक्रार रुग्णवाहिका चालक करत आहेत. 

हृदयविकार, अपघात, प्रसुती, विषबाधा, सर्पदंश आदी उपचारांची तत्काळ आवश्यकता असलेल्या तातडीच्या रुग्णांना जवळील मोठ्या रुग्णालयांत दाखल करून त्यावर उपचार सुरू करणे आवश्यक असते. यामध्ये हृदयविकाराच्या आणि गंंभीर अपघातांतील रुग्णांना जर एका तासाच्या आत उपचार मिळणे आवश्यक असते. या रुग्णांना घेऊन चाललेल्या रुग्णवाहिका अशा वाहतूक कोंडीत अडकली तर, रुग्णाचा जीव धोक्यात येतो. त्यातच काही वेळा चौकात रहदारी झाल्याने सायरन कितीही वाजवला तरी नागरिक रस्ता देत नाहीत. यावर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी शहरातील रुग्णवाहिका चालक श्रीकांत विपट यांनी दिली. 

शहराचा विस्तार चारही दिशांना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 2011 च्या जनगननेनुसार 35 लाख होती. ती गेल्या सहा वर्षात पाच ते दहा लाख लोकसंख्येची भर पडली आहे. शहरातील वाहनांची संख्यादेखील सुमारे 40 लाख आहे. तर, दररोज अकराशे नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत. त्यातच शहरातील रस्ते हे अरुंद असल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच बाब बनली आहे. याचा फटका वैद्यकीय सेवा देणार्‍या रुग्णवाहिकांना बसत आहे