Thu, Dec 12, 2019 08:57होमपेज › Pune › ‘सनबर्न’ विरोधात  रविवारी रास्ता रोको

‘सनबर्न’ विरोधात  रविवारी रास्ता रोको

Published On: Dec 23 2017 2:29AM | Last Updated: Dec 23 2017 2:19AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

बावधन परिसरात धुमधडाक्यात होणार्‍या सनबर्न फेस्टिवलच्या विरोधात रविवारी (दि. 24) चांदणी चौकात आंदोलन उभारण्यात येणार आहे. तसेच, यावेळी रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी दिली. या रास्ता रोकोबाबातचे निवेदन हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरुण वायकर यांना शुक्रवारी किरण दगडे पाटील यांनी दिले.  परसेट लाईव्ह प्रा. लिच्या वतीने सनबर्न फेस्टिवल 28 ते  31 डिसेंबर बावधन येथे होणार आहे. त्याला विरोध करण्यासाठी रविवारी हे आंदोलन सकाळी 10.30 वाजता उभारण्यात येणार असून, यावेळी रास्ता रोको करण्यात येणार आहे.