Mon, Aug 19, 2019 11:08होमपेज › Pune › ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले पुणे विद्यापीठात प्रोफेसर एमिरिटस्

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले पुणे विद्यापीठात प्रोफेसर एमिरिटस्

Published On: May 03 2018 6:37PM | Last Updated: May 03 2018 6:37PMपुणे : प्रतिनिधी

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'प्रोफेसर एमिरिटस्' म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. विद्यापीठातील माध्यम व संज्ञापन अभ्यास विभागात (Dept. of Media & Communication Studies) ही नेमणूक असेल. या नेमणूकीमुळे गोखले यांच्या अभिनय, सिनेमा क्षेत्रातील अनुभवाचा विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे.