Wed, Nov 21, 2018 18:35



होमपेज › Pune › जड वाहनांवर कडक कारवाई करणार

जड वाहनांवर कडक कारवाई करणार

Published On: Dec 03 2017 1:44AM | Last Updated: Dec 03 2017 1:29AM

बुकमार्क करा





पुणे : प्रतिनिधी

शहरात प्रमुख रस्त्यावर विशिष्ट वेळांमध्ये माल वाहतूक करणारे ट्रक, तसेच जड वाहनांना बंदी आहे. मात्र, तरीही शहरात या रस्त्यांवर सर्रास जड वाहने येतात. त्यामुळे या वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेतली आहे. वाहनचालकांनी बंदी घातलेल्या रस्त्यांवर जड वाहने आणू नयेत, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अशोक मोराळे यांनी केले आहे.

पुणे, तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलिसांकडून पुणे-नगर रस्ता, सोलापूर रस्ता, सातारा रस्ता, पुणे-मुंबई रस्त्यांवर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. 
या रस्त्यांवरून विशिष्ट वेळांमध्ये जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. काही रस्त्यांवर सकाळी आठ ते दुपारी बारा तसेच दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे.