Tue, Apr 23, 2019 13:39होमपेज › Pune › पुणेकरांची डोकेदुखी वाढली

पुणेकरांची ‘डोकेदुखी’ वाढली

Published On: Mar 06 2018 2:02AM | Last Updated: Mar 06 2018 1:07AMपुणे : प्रतिनिधी

तापमानातील तीव्र बदल, व्हायरल इन्फेक्शन आणि उन्हामुळे होत असलेले निर्जलीकरण यामुळे नागरिकांमध्ये केवळ डोकेदुखीच्या तक्रारी वाढल्या आहेत. थंडी- ताप नसताना केवळ डोकेदुखीचा त्रास वाढला आहे.  अशा वेळी भरपूर पाणी आवशक आहे. तसेच साध्या उपचारांनी डोके दुखणे बंद न झाल्यास डॉक्टरांचा सल्‍ला घेणे असल्याचे वैद्यकिय तज्ज्ञ सांगातात. 

  सध्या वातावरणामधील उच्चांकी आणि नीचांकी तापमानातील अंतर हे प्रमाणापेक्षा जास्त आहे. सायंकाळी पारा 15 अंश सेल्सिअस कमी तर दिवसा तो 35 अंश सेल्सिअसच्या पुढे जातो. या हवामानामुळे रात्रीच्या वेळी थंडी वाजते तर दिवसा उकाडा जाणवतो. तसेच अधुनमधून ढगाळ वातावरनही निर्माण होत असल्याने हवेत दमटपणाही येत आहे. यामुळे डोकेदुखी वाढली आहे. तसेच दिवसा उन आणि रात्री वातानुकूलित यंत्रणेचा अतिवापर केल्यामुळेही डोकेदुखी, डोके जड पडणे या तक्रारींमध्ये वाढ झाली असल्याची माहिती दत्‍तवाडी येथील जनरल प्रॅक्टिशनर डॉ. राजेश टिळेकर यांनी दिली.  

तर ससूनमधील मेडिसिन विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. नागनाथ रेडेवाड यांचेही मतही यापेक्षा वेगळे नाही. वातावरणातील तापमानातील फरकामुळे व्हायरल इन्फेक्शनमध्ये वाढ झाली आहे. तसेच दिवसा उकाडयामुळे घामाने शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे डोके दुखत असल्याचे डॉ. रेडेवाड यांनी सांगितले.

डोकेदुखीची अनेक कारणे आहेत मात्र सध्या वातावरणातील बदल हेच एक प्रमुख कारण असल्याचे त्यांनी सांगितीले. डोकेदुखी टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे, लिंबू -पाणी घेणे आवशक आहे. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होणार नाही. घरगुती उपाय करून, डोक्याची गोळी घेउनही डोकेदुखी थांबत नसेल, डोळयासमोर अंधारी येत असेल तर डॉक्टरांचा सल्‍ला घ्यावा अशी माहिती डॉ. रेडेवाड यांंनी दिली.