Sat, Nov 17, 2018 14:47होमपेज › Pune › विदर्भ, मराठवाड्यात आजही वादळी पाऊस

विदर्भ, मराठवाड्यात आजही वादळी पाऊस

Published On: Feb 12 2018 2:04AM | Last Updated: Feb 12 2018 2:04AMपुणे : प्रतिनिधी

विदर्भ, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी सोमवारी वादळी वार्‍यांसह पाऊस पडेल. तसेच तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र, बंगालचा उपसागर, अरबी समुद्रातून मराठवाडा, विदर्भाच्या दिशेने येणारे अतिउष्ण वारे, त्याचप्रमाणे स्थानिक वातावरणात झालेल्या बदलामुळे गेल्या 2-3 दिवसांपासून पाऊस पडत आहे, असे निरीक्षण हवामानतज्ज्ञांनी नोंदविले आहे.

दरम्यान, पश्‍चिम विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी रविवारी गारांसह मुसळधार पाऊस पडला. गारपिटीमुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली, तर उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते, असे हवामान विभागाने सांगितले. नीचांकी किमान तापमानाची नोंद जळगाव येथे 12 अंश सेल्सियस एवढी करण्यात आली.