Sat, Feb 23, 2019 11:10होमपेज › Pune › ‘अ‍ॅम्बी व्हॅली’ रडारवर

‘अ‍ॅम्बी व्हॅली’ रडारवर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा


पुणे  : दिगंबर दराडे

सहारा अ‍ॅम्बी व्हॅलीच्या (ता. मुळशी) मधील जागेच्या संदर्भात विविध प्रकारच्या त्रुटी उपस्थित करण्यात आल्या आहेत. येथील 750 ते 800 एकर जमीन वतनाची असल्याचे वास्तव पुढे आले आहे. वतनाच्या जमिनीचा शर्तभंग केल्याच्या कारणावरून ‘अ‍ॅम्बी व्हॅली’ला तब्बल 2400 कोटींपेक्षा अधिक नजराणा भरावा लागणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली. 

 जिल्हा प्रशासनाकडून एक अहवाल तयार करण्यात येणार असून, तो उच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर होईल. या सर्व त्रुटी आणि शंकांचे समाधान झाल्यानंतर अ‍ॅम्बी व्हॅलीच्या लिलावाची प्रक्रिया पुढे जाणार आहे. प्राथमिक पाहणी अहवालामध्ये 750 ते 800 एकर वतनाच्या जमिनीचा वापर झाल्याचे वास्तव पुढे आले आहे. अ‍ॅम्बी व्हॅलीची एकूण जागा सुमारे सात हजार एकर आहे.

यातील सुमारे 346 हेक्टर जागा वन विभागाची असून, ही जागा एकसलग नाही. ती तुकडे-तुकडे स्वरूपात आहे. एक एकर जागेची किंमत ही 6 कोटी रुपये इतकी निश्‍चित करण्यात आली आहे. इनाम अथवा वतन जमिनींचे हस्तांतरण करताना शासनदरबारी नजराणा भरावा लागतो. 
 


  •