Fri, May 24, 2019 02:26होमपेज › Pune › पुण्यात प्लास्टिकचा वापर अद्याप सुरूच

पुण्यात प्लास्टिकचा वापर अद्याप सुरूच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

राज्यात प्लास्टिक वापरावर राज्य शासनाने निर्बंध घातले असून, त्याची अंमलबजावणी सोमवार (दि. 19) पासून करण्यात आली. परंतु, पुण्यात बाजारपेठांमध्ये व्यावसायिकांमध्ये कारवाईची भीती असली तरी देखील गरजेनुसार प्लास्टिक पिशवी देण्यात येत असल्याचे दिसून आले. कापड्यांच्या दुकानांमध्ये, खाद्य पदार्थांची किरकोळ विक्री करणार्‍या दुकानात, हातगाडीवर फळविक्री करणारे आणि काही पुस्तक विक्रेत्यांकडून प्लास्टिकचा वापर 

अजूनही ग्राहकाची खात्री पटल्यानंतर प्लास्टिक पिशवी दिली जात असल्याचे दिसून आले. पर्यावरणाची हानी होत असल्याने प्लास्टिकवर निर्बंध घालण्यात आले. याला प्लास्टिक उत्पादक व्यापार्‍यांकडून विरोध झाला असला तरीदेखील, नागरिकांचा भविष्याचा विचार करून निर्णय घेतला असल्याचे म्हणणे मांडणारा दुसर्‍या वर्गाकडून प्लास्टिक बंदीचे समर्थन करण्यात आले. प्लास्टिक विक्री करणार्‍यांवर महापालिका कारवाई करणार आहे. प्लास्टिकचे ताट, कप, ग्लास, काटे, वाटी, चमचे, फ्लेक्स, बॅनर, तोरण, ध्वज, प्लास्टिक शीट्स या सर्व वस्तूंच्या उत्पादन, वितरण, साठवून ठेवणे आणि विक्रीवर बंदी आली आहे. हे सर्व असताना देखील पुण्यातील बाजारपेठांमधून अद्याप प्लास्टिकची विक्री सुरू आहे.

कापड दुकानात पैसे देऊन प्लास्टिकची पिशवी काही प्रमाणात विक्री सुरू आहे, तर काही दुकानदारांनी कापडी पिशव्या विक्रीस सुरुवात केली आहे. परंतु कापडी पिशवी दहा रुपयांच्यापुढे किंमत असल्याने नागरिक कापडी पिशवी विकत घेण्यास धजत नाहीत. दुकानदारांचे म्हणणे आहे की, ग्राहक पिशवी घेऊन येत नाहीत. अनेकांकडून पिशव्यांची मागणी होते, परंतु आम्ही बंदी असल्याचे सांगतो. कापडी किंवा कागदी पिशव्या घेण्यास ग्राहक लवकर तयार होत नाहीत.

चौकांमध्ये हातगाडीवर फळविक्रेत्यांकडे बिनधास्तपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर दिसून आला. उन्हाळ्यामुळे थंडपेयांना मागणी आहे लस्सी, सोडा यासाठी सर्रास प्लास्टिकच्या ग्लासचा वापर सुरू आहे, तर रविवार पेठेतील काही प्लास्टिक दुकानदारांनी प्लास्टिक बंदीच्या निषेधार्थ बंद पाळला आहे; परंतु त्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसून आले.
 


  •