Fri, Apr 26, 2019 09:50होमपेज › Pune › विद्यापीठातील शूटिंग लवकरात लवकर संपवा

विद्यापीठातील शूटिंग लवकरात लवकर संपवा

Published On: Feb 06 2018 1:48AM | Last Updated: Feb 06 2018 1:42AM पुणे ; प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना विद्यापीठाच्या मैदानावरील शूटिंग लवकर संपविण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, विद्यापीठाने नियमांना धाब्यावर बसवत मैदान शुटिंगसाठी दिल्याने विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाचा निषेध करत मैदान खाली करण्याची मागणी केली होती. विद्यापीठाद्वारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी विद्यापीठाचे मैैदान 45 दिवसाच्या भाडे करारावर दिले होते. दरम्यान, तब्बल तीन महिन्याचा कालावधी लोटूनही मैदानावर शुटिंग सुरू झाले नाही.  बाजारभावानुसार मैदानाचे भाडे वसूल करत त्वरीत मैदान खाली कऱण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद, जनता दल युनाएटेड आदी विद्यार्थी संघटनांनी केली आहे.

दरम्यान,या प्रकरणात शर्तभंग झाल्याचा ठपका पुणे शहर तहसिल कार्यालयाने ठेवला असून विद्यापीठावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच     त्यातच राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाने देखील विद्यापीठाच्या या कारभाराची चौकशी सुरु केली असून विद्यापीठाला अहवाल मागितला आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने राज्य सरकार, विद्यापीठाची मॅनेजनेंट कौन्सील आणि उच्च शिक्षण संचालनालयाची परवानगी न घेता मंजुळेंना मैदान भाड्याने दिल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मंजुळे यांनी शूटिंगसाठी कालावधी वाढवून देण्याची विनंती विद्यापीठाकडे केली असून त्यावर विद्यापीठाने शूटिंग लवकर संपविण्याच्या सूचना दिल्या आहेत 


 चित्रिकरणाला 35 दिवस लागणार :  नागराज मंजुळे

मी फूटबॉल या खेळावर चित्रपट तयार करत आहे.  विद्यापीठातील चित्रिकरण 28 दिवसांचे असून त्यानंतर मैदान पूर्ववत करायला 6-7 दिवसांचा कालावधी लागेल. त्यामुळे  मैदान  35 दिवस वापरणार आहोत. चित्रपट तयार करताना काही गवसत असते तर काही सूटत असते. त्यामुळे विलंब होत असून त्यात अमिताभ बच्चन यांच्या तारखा मिळवण्यात वेळ गेला. दरम्यान, विद्यापीठाच्या सूचनेनुसार शूटिंग लवकर पूर्ण करणार असून तोपर्यंत विद्यार्थी आणि विद्यापीठ प्रशासनाने सहकार्य करणाचे आवाहन दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले.