होमपेज › Pune › सत्तेचे खरे लाभार्थी भाजपचं!

सत्तेचे खरे लाभार्थी भाजपचं!

Published On: Dec 03 2017 1:44AM | Last Updated: Dec 03 2017 1:37AM

बुकमार्क करा

पुणे :प्रतिनिधी 

सध्या समाजातील सर्व घटक त्रस्त आहे, त्यात भाजप सरकारकडून मी लाभार्थी सारख्या जाहिराती केल्या जात आहेत. खोटं बोल, पण रेटून बोलं ही पद्धती अवलंबिली जात आहे. मात्र सत्तेचे खरे लाभार्थी भाजपचं असल्याची जळजळीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित  सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले. बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात कनेक्ट काँग्रेस या अभियानाचा प्रारंभ  झाला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे,  माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, शरद रणपिसे, आमदार अनंत गाडगीळ, रामदार फुटाणे, रमेश बागवे, दीप्ती चवधरी, बाळासाहेब शिवरकर, अरविंद शिंदे, आबा बागुल, कैलास कदम, सोनाली मारणे आदी उपस्थित होते. या सप्ताहाचे यंदा 13 वे वर्ष आहे

. कार्यक्रमात कनेक्ट काँग्रेसच्या फेसबुक पेजचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते झाले.  सुशीलकुमार शिंदे म्हणाले, काँग्रेसच्या काळात तरुणांना नोक-या देण्याचे काम आम्ही केले. मात्र, भाजपाने नोटाबंदी करुन तरुणांच्या नोक-या घालविण्याचे काम केले आहे. आजपर्यंत 40 लाख तरुणांच्या नोक-या गेल्या आहेत.  गुजरात निवडणुकांकरीता नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या मतदारसंघात दर दिवसाआड बैठका घेतल्या.  

 मोहन जोशी म्हणाले,  काँग्रेसी योजनांचा लाभ घेऊन पुढे आलेली युवा पिढी आणि दूर गेलेला सुशिक्षीत वर्ग या अपप्रचाराला बळी पडला. त्यांना पुन्हा काँग्रेसकडे वळविण्याकरीता काँग्रेस कनेक्ट हे अभियान राबविण्यात येणार असून त्याचा प्रारंभ पुण्यामध्ये होत आहे.  कार्यक्रमात कनेक्ट काँग्रेसच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सई देशमुख, हर्ष खुनगर, यशपाल जुडावत, विशाल ढोरे, यशराज पारखी, विशाल मांढरे यांनी आपले  मनोगत व्यक्त केले.