Thu, Jun 27, 2019 16:32होमपेज › Pune › प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप मागे

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप मागे

Published On: Jun 20 2018 1:15AM | Last Updated: Jun 20 2018 1:03AMपुणे : प्रतिनिधी

गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप मंगळवारी रात्री मागे घेण्यात आला. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी येत्या दोन महिन्यांत विद्यावेतन वाढवून देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आल्याची घोषणा असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स  (अस्मि) या संघटनेने केली. बुधवारपासून राज्यातील सर्व डॉक्टर कामावर हजर होणार आहेत, असे डॉ. दर्शन कलाल यांनी सांगितले.

राज्यातील 18 वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील अडीच हजार  प्रशिक्षणार्थी डॉक्टर विद्यावेतन 6 हजारावरून अकरा हजार करण्याच्या मागणीसाठी संपावर होते. त्यामध्ये पुण्यातील बी. जे.च्या सुमारे 200 डॉक्टरांचा समावेश होता.