Sat, Nov 17, 2018 18:31होमपेज › Pune › कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल चौदा वाहतूक निरीक्षक निलंबित

कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल चौदा वाहतूक निरीक्षक निलंबित

Published On: Jan 14 2018 1:53AM | Last Updated: Jan 14 2018 1:38AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

कामावर गैरहजर राहणार्‍या चालक- वाहकांचा अहवाल तयार करून त्यांच्यावर कारवाई न करता कामात  हलगर्जीपणा  केल्याचा ठपका ठेवत पीएमपी प्रशासनाने 14 वाहतूक निरीक्षकांना  निलंबीत केले आहे.  ‘पीएमपी’चे व्यवस्थापकीय संचालक पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी  कामात हलगर्जीपणा करणार्‍या  कर्मचार्‍यांचे निलंबनास सुरूवात केली आहे.त्यामध्ये  आता  आणखी 14 जणांची वर्णी लागली आहे. त्यानुसार  पांडुरंग धापटे व  सिद्धार्थ सोणावणे (स्वारगेट), भगवान कोठावळे व संजय जाधव (न.ता.वाडी),  अविनाश बनकर व जी.पी. शेळकंदे (कोथरूड), राजेंद्र कडू व अशोक

भोसले (कात्रज), राहुल गायकवाड व रमेश सुपेकर (हडपसर), एस. व्ही. खोले व बा.सी. वाळके (पुणे स्टेशन), रामदार ढोरे व प्रदीप धर्मे (पिंपरी) अशी निलंबीत केलेल्या वाहतूक निरीक्षकांची नावे आहे.  
नियमानुसार कोणत्या वाहक-चालकाला कोणता मार्ग  द्यायचा ,त्यांची ड्युटी वेळ  काय ठेवायची त्याचप्रमाणे  कर्मचा-यांची हजेरी तपासायची  त्याचबरोबर कर्मचा-यांच्या  कामाचा अहवाल तयार करून  प्रशासनाला पाठविणे  अशी जबाबदारी या वाहतूक निरीक्षकांकडे   होती. दरम्यान ऑगस्ट ते डिसंबरमध्ये या  कालावधीत अनेक  वाहन-चालक सुट्टीवर  असल्याचे निदर्शनात आल्यानंतर या निरीक्षकांकडे अहवाल मागण्यात आला होता. त्यातून अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचे समोर आले. मात्र त्या बाबात त्यांच्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. तसेच ही बाब प्रशासनालाही कळविण्यात आली नसल्याचे दिसून आले.हा  ठपका ठेवत  वाहतूक निरीक्षकांना निलंंंबीत करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.