Thu, Apr 25, 2019 15:31होमपेज › Pune › ‘या’ निर्णयामुळे देशी दारूच्या विक्रीवर परिणाम

‘या’ निर्णयामुळे देशी दारूच्या विक्रीवर परिणाम

Published On: Dec 12 2017 2:08AM | Last Updated: Dec 12 2017 2:08AM

बुकमार्क करा

पुणेेे : प्रतिनिधी

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील वाढत्या अपघातांना महामार्गावर सुरू असलेली मद्यालये कारणीभूत आहेत. त्यामुळे महामार्गावर 500 मीटर आतील सर्व प्रकारची मद्यविक्रीची केंंद्रे बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या निर्णयामुळे शहर आणि जिल्ह्यातील 1 हजार 619 मद्यालये बाधित झाली होती. मद्यविक्री बंदीमुळे देशी दारूच्या विक्रीमध्ये 15 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यापाठोपाठ बीअर 11 टक्के, विदेशी मद्य आणि वाईनच्या विक्रीत 8 टक्क्यांनी घट झाली आहे. शहरातून जाणारे राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग वगळण्याचे आदेश दिले. 

महामार्गावरील वाढते अपघात मद्यालयांमुळे होत असल्याचा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर 2016 मध्ये राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील सर्व मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. 1 एप्रिल 2017 पासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. यात पुणे शहर आणि जिल्ह्यातील 1 हजार 619 मद्यालये बाधित झाली होती. परिणामी मद्यविक्री आणि शासनाला मिळणार्‍या महसुलाला फटका बसला आहे. एप्रिलमध्ये 20 लाख 47 हजार 712 लीटर देशी दारुची विक्री झाली असून एप्रिल 2016 पेक्षा 5 लाख 59 हजार 915 लिटरने ( 27 टक्के) घट झाली आहे. एप्रिल ते ऑक्टोंबर 2016 मध्ये 1 कोटी 26 लाख 52 हजार 451 लीटर देशी दारू विकली होती. तर, चालू वर्षात 21 लाख 89 हजार 454 लीटरने घट होऊन 1 कोटी 48 लाख 41 हजार 905 लीटर देशी दारूची विक्री झाली आहे.

भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत 8 टक्क्यांनी घट झाली आहे. एप्रिल 2016 मध्ये 19 लाख 49 हजार 145 लीटरची विक्री झाली होती. तर, महामार्गावरील मद्यबंदीच्या अंमलबजावणीनंतर एप्रिल 2017 मध्ये 18.15 टक्क्यांनी विक्री घटली आहे. बीअरच्या विक्रमध्येही एप्रिल ते ऑक्टोंबर 2016 पेक्षा 2017 मध्ये 11 टक्क्यांनी विक्रीत घट झाली आहे. चालू वर्षात स्ट्राँग आणि माईल्ड बीअरची दोन कोटी 26 लाख 27 हजार 460 लीटरची विक्री झाली आहे. ती 2016 पेक्षा 31 लाख 83 हजार 919 लीटरने कमी आहे. वाईनच्या विक्रीत 8 टक्क्यांची घट झाली असून गेल्या वर्षी 6 लाख 6 हजार 563 लीटरची विक्री झाली होती. यंदा ती 48 हजार 228 ने घटून 5 लाख 58 हजार 335 लीटरची विक्री झाली आहे.