होमपेज › Pune › राज्यामध्ये उद्या पावसाची शक्यता

राज्यामध्ये उद्या पावसाची शक्यता

Published On: Feb 06 2018 2:09AM | Last Updated: Feb 06 2018 2:01AMपुणे : प्रतिनिधी

उत्तरेकडून राज्याच्या दिशेने वाहत येणार्‍या थंड वार्‍याचा प्रवाह कमी होत असल्याने राज्यातील बहुतांश भागातील किमान तापमानात वाढ होत आहे, त्यामुळे थंडी कमी होत आहे. दरम्यान मालदीव ते अरबी समुद्र आणि कर्नाटक परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बुधवार दि.7 रोजी दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मागील 24 तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदविण्यात आलेले किमान तापमान (अंश सेल्सिअस)  मुंबई 21.0,  रत्नागिरी 18.6, भिरा 16.3, पुणे 13.1, अहमदनगर 11.2, जळगाव 11.6, कोल्हापूर 16.3, महाबळेश्वर 15.6, मालेगाव 14.5, नाशिक 12.2.