Wed, Apr 24, 2019 11:48होमपेज › Pune › ऐन थंडीत जमिनीतून आले गरम पाणी

ऐन थंडीत जमिनीतून आले गरम पाणी

Published On: Dec 14 2017 2:16AM | Last Updated: Dec 14 2017 2:09AM

बुकमार्क करा

भोसरी: वार्ताहर

महापालिकेच्या भोसरी सहल केंद्रातील परिसरात अचानकपणे खड्ड्यातून उकळते पाणी येऊ लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वाताचवरण निर्माण झाले होते. हिवाळ्यात गरम पाणी येऊ लागल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, या परिसराची पाहणी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागातील भूगर्भशास्त्रज्ञ केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्‍वास सोडला.

भोसरी सहल केंद्रामध्ये जलतरण तलवाच्या पाठीमागील बाजूस एका खड्ड्यातून वाफ येत असल्याचे सुरक्षारक्षक संदीप सुभाष माने यांनी मंगळवार (दि 12) रोजी पहिले. गेले दोन दिवस हा प्रकार सुरु असल्याचे माने यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले. या खड्ड्याच्या ठिकाणी वाफे सह उकळते पाणी येत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. ही बातमी वार्‍यासारखी पसरली. परिसरातील नागरिकांनी गरम पाण्याचा कुंड पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या कुंडात पाण्याची प्लास्टिकची बाटली टाकली असता बाटली वितळत होती.

या गरम पाण्याच्या ठिकाणी खोदले असता त्या ठिकाणी चार पाच वषार्ंपासून बंद पडलेली विद्युत पुरवठा करणारी केबल असल्याचे आढळून आले. सांयकाळच्या वेळी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण भूगर्भ अधिकारी येऊन या ठिकाणची त्यांनी पाहणी केली. त्याचबरोबर त्यांनी घटनास्थळाचे सर्वेक्षण करीत विविध चाचण्या देखील केल्या.