Tue, Jul 16, 2019 01:42



होमपेज › Pune › मेट्रोचा पहिला ‘व्हायडक्ट’ खराळवाडीत 

मेट्रोचा पहिला ‘व्हायडक्ट’ खराळवाडीत 

Published On: Dec 16 2017 2:26AM | Last Updated: Dec 16 2017 2:26AM

बुकमार्क करा





पिंपरी : प्रतिनिधी 

पुणे मेट्रो प्रकल्पाचा  पहिला  “व्हायडक्ट’ खराळवाडी, पिंपरी येथे गुरुवारी (दि. 14) बसविण्यात आला आहे. मेट्रोचा पहिला पिलर (खांब) उभारण्याचा मानही पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत मिळाला आहे. तो पिलर शंकरवाडी, कासारवाडी येथे उभारण्यात आला आहे. सर्व डक्ट बसविल्यानंतर मेट्रोचे लोखंडी रूळ बसविण्याचे काम सुरू केले  जाणार आहे.  ‘प्री स्ट्रेसड सेगमेंटल बॉक्स गर्डर’ तंत्रज्ञांच्या माध्यमाने  या डक्टची निर्मिती झाली आहे. एकूण 45 टन वजनाच्या हे डक्ट पिलरवर जोडताना बसविताना 200 टन वजनाच्या अद्ययावत क्रेनचा वापर करण्यात आला. सर्वसाधारणपणे 28 मीटर गर्डर करता दहा डक्ट (सेगमेंट) वापरले जातात. हे सर्व डक्टनंतर एका सूत्रात बांधले जातात. हे डक्ट कासारवाडीतील नाशिक फाटा चौकाजवळील ‘कास्टिंग यार्ड’मध्ये तयार केले जात आहेत. 

 या डक्टच्या निर्मितीदरम्यान गुणवत्तेसंबंधी आवश्यक चाचणी केली जाते. ‘अल्ट्रा सोनिक पल्स व्हेलॉसिटी टेस्ट’ नावाच्या अतिशय खडतर चाचणीचा त्यात समावेश आहे. या सर्व चाचण्या डक्ट लावण्यापूर्वी केल्या जातात. पिलरवर डक्टच्या उभारणीचे काम पूर्ण झाल्यावर मेट्रोचे लोखंडी रूळ बसविण्याचे काम सुरू केले जाणार आहे. दरम्यान, मेट्रोचे काम प्रथम पिंपरी-चिंचवड शहरात सुरू झाले आहे. हे काम दिवसरात्र वेगात सुरू असून, मेट्रोचा पहिला पिलरही शंकरवाडी, कासारवाडी येथे उभारण्यात आला आहे. कामाचा वेग पाहता पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी ते दापोडी मार्गावरील मेट्रोचे काम पहिल्यांदा पूर्ण होण्याची  शक्यता आहे.