Sat, Jul 20, 2019 15:08होमपेज › Pune › ड्रोन आता बनणार मेघदूत

ड्रोन आता बनणार मेघदूत

Published On: Jan 09 2018 1:35AM | Last Updated: Jan 09 2018 12:35AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

काळाच्या ओघात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्याचा निर्णय टपाल विभागाने घेतला आहे. त्यानुसार पुण्यात होणार्‍या ‘महापेक्स 2018’ या प्रदर्शनात ड्रोनच्या सहाय्याने टपाल घेऊन जाण्याचे प्रात्याक्षिक दाखविण्यात येणार आहे. त्यानुसार गणेश कला क्रिडा रंगमंच येथून ड्रोनद्वारे टपाल घेऊन ते स्वारगेट येथील पोस्ट कार्यालयात नेले जाणार आहे. यासाठी तात्पुरत्या पोस्ट कार्यालयाची सुविधादेखील प्रदर्शनस्थळी करण्यात येणार आहे, अशी माहिती टपाल विभागाचे  पोस्टमास्तर जनरल गणेश सावळेश्‍वरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.  टपाल कार्यालयाच्या महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांच्या वतीने खास संग्रही ठेवण्यास उपयोगी असणार्‍या टपाल तिकिटांचे ‘महापेक्स 2018’ या प्रदर्शनाचे आयोजन 20 ते 22 जानेवारी या कालावधीत होणार आहे. या प्रदर्शनादरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजनदेखील करण्यात आले आहे. 

या  महापेक्स प्रदर्शनात सुमारे  100 टपाल टिकीट संग्रहकांच्या 400 तिकीटांच्या फ्रेम्स ठेवण्यात येणार आहेत. या शिवाय राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त तिकीट संग्रहकांच्या तिकाटांचेही या प्रदर्शनात काही फ्रेम्स ठेवण्यात येणार आहेत.  महापेक्स प्रदर्शनात प्रश्‍नमंजुषा, स्टॅम्प डिझाईनस्पर्धा, पत्रलेखन स्पर्ध, शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा हे उपक्रमही आयोजित केले आहेत. यावेळी आठ विशेष टपाल पाकिटांचे प्रकाशन होणार आहे.  तिकीट संग्रहकांसाठी महापेक्स 2018 स्मरणिकेचे प्रकाशनही  होणार आहे. त्यामध्ये फिलाटेली साहित्य, टपाल तिकीटांच्या इतिहासाची माहिती आदीचा समावेश आह.  सेगवे वाहनाव्दारे पोस्टमन करणार टपालांचे वाटप सायकलीवरून टपाल वाटप करणारा कर्मचारी अशी व्याख्याच आतापर्यंत तयार झाली होती. आता काळाच्या ओघात बॅटरीवर चालणार्‍या सेगवे वाहनाव्दारे पोस्टमन टपाल घेऊन जवळ असलेल्या टपाल कार्यालयात जाणार आहेत. याबाबतचेदेखील प्रात्याक्षिक यावेळी दाखविण्यात येणार आहेत.