होमपेज › Pune › पुण्याचा चहावाला कमावतोय महिन्याला १२ लाख!

पुण्याचा चहावाला कमावतोय महिन्याला १२ लाख!

Published On: Mar 04 2018 2:07PM | Last Updated: Mar 04 2018 2:07PMपुणेः पुढारी ऑनलाईन

पुण्यातील चहावाल्याची महिन्याची कमाई ऐकून आपण थक्क व्हाल. देशातील कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला महिन्याला मिळत नाही ऐवढी कमाई या चहावाल्याची आहे. हा चहावाला दरमहा १२ लाख रूपये कमावतो. नवनाथ येवले असे त्याचे नाव असून 'येवले' चहा हाऊसचा तो मालक आहे. 

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, नवनाथ येवले नावाचा हा व्यक्ती चहा विकून महिन्याला १२ लाख रूपयांची कमाई करतो. 'येवले टी हाऊस' हे ठिकाण पुण्यासह महाराष्ट्रातील प्रसिद्ध चहा स्टॉल्सपैकी एक आहे. पुण्यामध्ये  'येवले टी हाऊस' चे तीन सेंटर असून प्रत्येक सेंटरवर १२ लोक काम करतात. 

चहा व्यवसायातील यशामुळे नवनाथ येवले आनंदित आहे, भविष्यात या चहाची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करण्याची त्यांची इच्छा आहे. चहा व्यवसाय सध्या देशात चांगले रोजगार निर्माण करत असल्याचे त्यांचे मत आहे.