Fri, Jul 19, 2019 22:01होमपेज › Pune › खराब हवामानामुळे स्वाइन फ्लू परतला

खराब हवामानामुळे स्वाइन फ्लू परतला

Published On: Feb 11 2018 1:35AM | Last Updated: Feb 11 2018 12:19AM पुणे  : प्रतिनिधी

शहरात यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत एकूण एक लाख पाच हजार 914 रुग्णांची तपासणी केली असून, त्यापैकी तिघेजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी दोघांवर उपचार झाले असून त्यांना डिस्चार्ज झाला आहे, तर तिसरा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे.  यावर्षीच्या सुरुवातीला शहरतील स्वाइन फलू शांत आहे. तरीही सर्दी - खोकला, ताप असलेल्या रुग्णांची काही कमी नाही. म्हणून शहरातील महापालिकेच्या बाह्यरुग्ण विभाग, प्रसूतीगृहांमध्ये दररोज अडीच ते तीन हजार रुग्णांचे स्क्रीनिंग होत आहे. मात्र त्यापैकी फार कमी रुग्ण संशयित आढळून येत आहेत. पण हे रुग्ण मार्चनंतर वाढण्याची शक्यता आहे.

शहरात आतापर्यंत एक लाख पाच हजार तपासणी केलेल्या रुग्णांपैकी एक हजार 775 संशयित रुग्णांना टॅमिफलू देण्यात आले आहे. तर 209 रुग्णांचे घशातील द्राव अर्थात स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. त्यापैकी शनिवारी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. असे आतापर्यं तीन रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. सध्या गर्भवती महिला, मधुमेही, उच्च रक्‍तदाब यांना मोफत लसीकरण करण्यात येते. पण आता लहान मुलांनाही मोफत लस देण्यात येणार आहे.  स्वाइन फलू मुळे गेल्यावर्षी पुण्यात 148 रुग्णांचा तर राज्यात 778 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर यावर्षी पिंपरीमधील एक मिळून राज्यात सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. 

महापालिकेने घ्यावी काळजी

गेल्यावर्षी स्वाइन फलू ने शहरात थैमान घातले होते. ती वेळ परत येउ नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने आतापासूनच काळजी घेणे आवशक आहे. यामध्ये सर्वात प्रथम अतिजोखमीच्या रुग्णांचे (गर्भवती, मधुमेही, उच्च रक्‍तदाब, लहान मुले) यांचे प्राधान्याने लसीकरण करून घेणे आवशक आहे. त्यासाठी पालिकेने नागरिकांमध्ये जनाजागृती आतापासूनच  करणे आवशक आहे. कारण लसीकरण करून घेतल्यानंतर एक एक वर्षभर त्याचा प्रभाव टिकतो व या रुग्णांना त्याची लागण होत नाही.  जर हे आता केले नाही तर आयत्या वेळी काही एक करता शक्य नाही. तसेच शासकीय आणि खाजगी डॉक्टरांच्या कार्यशाळा घेउन त्यांना स्वाइन फलू ची लक्षणे, त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी याबाबत माहिती देणे आवशक आहे.