Sat, Jul 20, 2019 13:19होमपेज › Pune › पोटाच्या खळग्यासाठी, काय वाट्टेल ते

पोटाच्या खळग्यासाठी, काय वाट्टेल ते

Published On: Feb 04 2018 2:00AM | Last Updated: Feb 04 2018 1:58AMपुणे :  प्रतिनिधी

पोटाची खळगी भरण्यासाठी  अनेकजण कुटूंबियांसह माहनगराची वाट धरतात. पण तिथे रोजगार मिळेल याची खात्री नसते. महानगरात आल्यानंतर एक वेळची भाकरी मिळण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारीही या लोकांची असते. परंतु, त्यासाठी एका पित्यानेच पोटच्या मुलांना भीक मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार सांगवी परिसरातील  पिंपळे सौदागर येथे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी स्वराज देविलाल बागडिया (वय 49, रा. लालटोपी, मोरवाडी, पिंपरी, मूळ. बिहारीपुरी, राजस्थान) याला अटक सांगवी पोलिसांनी केलेली आहे. 
शहरातील चौकांमध्ये भीक मागणारी मुले नागरिक पाहत असतात. त्यांची एकूणच अवस्था पाहून त्यांना आर्थिक मदतही केली जाते.

मात्र, ती मुले का भीक मागत आहे याच्या मूळाशी जाण्यासाठी कोणालाही वेळ नसते. त्यामुळे दिवसेंदिवस या मुलांच्या संख्येत वाढ होत आहे. यातील अनेक मुले आपल्या कुटूंबियांसाठी स्वइच्छेने भीक मागतात तर काही जण दबावाखाली हे काम करत असतात. काही वेळा ही मुले हा प्रकार सांगण्याचा प्रयत्नही करतात पण कोणीही लक्ष देत नाही, असा एक प्रकार पिपळे सौदागर येथे घडला आहे. 
स्वराज बगाडिया हे आपल्या तीन मुलांसह चार महिन्यांपूर्वी राजस्थानमधून रोजगारासाठीच पिंपरीत आले होते.  पण काही काम मिळत नसल्याने त्यांनी चक्क आपल्या दोन मुले व मुलगीला भीक मागण्यास भाग पाडले.  गेली कित्येक दिवस हा प्रकार सुरू होता.

सामाजिक सुरक्षा विभागाला हा प्रकार समजताच त्यांनी तात्काळ या मुलांना ताब्यात घेत त्यांच्याकडे यासंदर्भात विचापुस केली. त्यावेळी वडीलांनीच भीक मागण्यास सांगितले. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.  पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने स्वराज बगाडियाला अटक केली. या मुलांनाही सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील, सहायक निरीक्षक शीतल भालेकर, कर्मचारी तरटे, ठोंबरे यांच्या पथकाने केली.