Fri, Jan 18, 2019 12:59होमपेज › Pune › पुण्याजवळ सनबर्न पार्टीची तयारी उधळली

पुण्याजवळ सनबर्न पार्टीची तयारी उधळली

Published On: Dec 16 2017 2:26AM | Last Updated: Dec 16 2017 7:22AM

बुकमार्क करा

पुणे / पौड : प्रतिनिधी

मुळशी तालुक्यातील लवळे आणि बावधन या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या ऑक्सफर्ड गोल्फ क्लब परिसरात महिनाअखेरीस होणार्‍या सनबर्न पार्टीला दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. कार्यक्रमाच्या नियोजित ठिकाणी जाऊन दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी पार्टीच्या तयारीचे काम बंद पाडले. 

ग्रामपंचायतीकडून परवाना रद्द

सनबर्न फेस्टिवलसाठी म्हणून देण्यात आलेले ना हरकत प्रमाणपत्र लवळे ग्रामपंचायतीने (ता. मुळशी) जनमताच्या विरोधानंतर अखेर शुक्रवारी रद्द केले. त्यामुळे आता बावधनमधूनही ‘सनर्बन’च्या आयोजकांवर बस्तान गुंडाळण्याची वेळ आली आहे. 15 डिसेंबरला ग्रामपंचायतीत झालेल्या विशेष ग्रामसभा बैठकीत हा निर्णय झाला.