Sat, Apr 20, 2019 18:00होमपेज › Pune › दृष्टिदोषांवर मात करीत ‘किंजल’ने मिळविले यश

दृष्टिदोषांवर मात करीत किंजल’ने मिळविले यश

Published On: Feb 04 2018 1:55AM | Last Updated: Feb 04 2018 1:26AMपुणे : प्रतिनिधी

 प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आणि केवळ 20 टक्के दृष्टी असताना सीएच्या सीपीटी या अतिशय अवघड समजल्या जाणा-या परीक्षेत मोठ्या परिश्रमाने आणि चिकाटीने किंजल पोपट हिने यश मिळवले. चिखली या छोट्याशा  गावातून ती पुण्यात आली. तिच्या शैक्षणिक आणि भावी आयुष्याची चिंता पालकांना होती.  परंतु शारीरिक कमतरतेवर मात करून ती शिकत आहे. वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर तसेच गुरूंविषयी निष्ठा या दोन गोष्टी तिच्या पंखांना बळकटी देत आहेत.

किंजलला  सुरुवातीपासूनच शिकण्याची इच्छा होती परंतु गावामध्ये फारशा सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे तिने पुण्यात येण्याचे ठरविले. पुण्यात आल्यावर तिने सचोटीने अभ्यास केला. शिक्षकांनी तिच्या गरजा समजूून घेऊन प्रत्येक पायरीवर मदत केली. त्यांच्यामुळेच सीपीटी सारखी महत्त्वाची परिक्षा पास झाले अशी भावना किंजलने व्यक्त के.ली. किंजलच्या या यशात सर्वात मोठा वाटा आहे, तो डॉ .शिशिर पुराणिक या शिक्षकांचा. पुराणिक हे डॉक्टर असूनदेखील चांगले विद्यार्थी घडविण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे.किंजल सारख्या मेहनत घेणार्या मुलीला त्यांनी मार्गदर्शन केले. किंजलच्या यशाबद्दल सांगताना पुराणिक म्हणाले, किंजल अतिशय सामान्य कुटुंबातील मुलगी आहे.

परंतु तीची जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी यामुळे तिने यश मिळविले. दहावीच्या परीक्षेत देखील घवघवीत यश तिने संपादित केले. अभ्यास करणे तिच्यासाठी सोपे नव्हते. एस.एस. कॅम्पसमध्ये शिक्षणासाठी आल्यानंतर फळ्यावरचे किंवा पुस्तकातील अक्षर दिसणे फार अवघड जायचे त्यामुळे तिच्यासाठी आवश्यक सगळी पुस्तके एन्लार्ज म्हणजे ठळक मोठ्या आकारामध्ये छापून घेतली. त्यामुळे जिद्दीने अभ्यास करीत यशाची पायरी ती चढत आहे.