Sat, Apr 20, 2019 23:51होमपेज › Pune › वर्धापनदिनीच विद्यापीठात झाला राडा

वर्धापनदिनीच विद्यापीठात झाला राडा

Published On: Feb 11 2018 1:35AM | Last Updated: Feb 11 2018 12:13AMपुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यापीठाच्या 69 व्या वर्धापनदिना दिवशीच दोन विद्यार्थी संघटनांते राडा झाला. विद्यापीठात अभाविप आणि एसएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समोरासमोर येउन एकमेकांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. विद्यापीठाच्या अनिकेत कँन्टीन परिसरात एसएफआय संघटनेद्वारे आयोजित जागर जथ्या शनिवारी विद्यापीठात पोहचला. यावेळी संघटनेद्वारे बेरोजगार युवा आणि विद्यार्थ्यांमध्ये जाणिव जागृतीबाबत सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, यावेळी अभाविपच्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली.

मोदी जिंदाबाद... नक्शलवाद मुर्दाबाद... सारख्या घोषणा संघटनेद्वारे देण्यात आल्या. याला प्रत्युत्तर म्हणून एसएफआय यसंघटनेच्या प्रतिनीधींनीही समोरासमोर घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे विद्यापीठातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.  दरम्यान, विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांना हा गदारोळ आटोक्यात आणने अशक्य झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्णाण होवू नये यासाठी तात्काळ विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. पोलीसांनी हस्तक्षेप केल्यानंतर विद्यापीठातील परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, काही दिवसांपुर्वी या दोन संघटनांमध्ये मोठा वाद झाला होता. त्यावेळी या वादाचे रुपांतर हाणामारी मध्ये झाले होते.