Sun, Jul 21, 2019 06:23होमपेज › Pune › शेअर बाजारात त्सुनामी

शेअर बाजारात त्सुनामी

Published On: Feb 07 2018 1:46AM | Last Updated: Feb 07 2018 1:39AMपुणे : प्रतिनिधी

जगभरातील शेअर बाजारांसाठी मंगळवार हा दिवस ‘काळा’ ठरला. जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, तैवान आदी देशांतील शेअर बाजारांबरोबरच भारतीय शेअरबाजार आज मोठ्या प्रमाणावर कोसळले. जपानचा निक्केई निर्देशांक 4.6 टक्क्यांनी कोसळला. ऑस्ट्रेलिया शेअरबाजार तीन टक्क्यांनी घसरला, तर दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराने दोन टक्क्यांनी आपटी खाल्ली. मुंबई  शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स 1,200 अंशांनी आपटला.

काही सेकंदातच गुंतवणूकदारांच्या 5 लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला. एकाक्षणी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1,274 अंशांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी  390 अंशांनी उतरला. ही तब्बल 3.65 टक्क्यांची घसरगुंडी होती. सोमवारी अमेरिकी शेअर बाजारात झालेल्या धुळधाणीची छाया जगभरातल्या शेअर बाजारांवर मंगळवारी दिसून आली. इतिहासामध्ये एकाच दिवशी झालेली ही सर्वाधिक पडझड आहे. मात्र, दिवसअखेरीस भारतीय निर्देशांकांत किंचित सुधारणा झाली.