Wed, Nov 21, 2018 16:08होमपेज › Pune › वर्षा सरले तरी क्रीडा समिती कार्यालयाविनाच

वर्षा सरले तरी क्रीडा समिती कार्यालयाविनाच

Published On: Feb 14 2018 2:55AM | Last Updated: Feb 14 2018 1:54AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या क्रीडा समितीला आणि समितीच्या अध्यक्षांना जवळपास वर्ष होत आले तरी बसण्यासाठी अद्यापही कार्यालय मिळाले नाही. कार्यालयाविनाच या समितीचा कारभार सुरू असून त्याचा थेट परिणामही कामकाजावर होत आहे. सत्ताधारी भाजपकडे महापालिकेतील सर्वच पदे आहेत. त्यात विषय समित्यामध्ये महत्वाच्या असलेल्या क्रिडा समितीवर भाजपकडून तरुण आणि नव्या दमाचे नगरसेवक सम्राट थोरात यांनाअध्यक्षपदाची संधी देण्यात आली. मात्र, या समिती अध्यक्षांना बसण्यासाठी  वर्षभरात साधे कार्यालयही पक्षाला देता आलेले नाही.

पालिका निवडणूकांना या महिन्यात वर्ष पुर्ण होत आहे. तसेच मार्चमध्ये या समितीच्या अध्यक्षांचा कार्यालय संपुष्टात येत आहे. त्यामुळे कार्यालयाविनाच या समितीला काम करावे लागले. अध्यक्ष थोरात यांना पहिले दोन ते तीन महिने कार्यालयासाठी महापौरांकडे पाठपुरावा केला, मात्र, त्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने अखेर त्यांनीही कार्यालयाचा नाद सोडला. त्यामुळे आता थेट नविन इमारतीमध्येच  अध्यक्षांचे आणि समितीचे कार्यालयाचे स्वप्न पुर्ण होणार आहे. 

रिपाईला अनधिकृतरित्या कार्यालय

एकिकडे महत्वाची समितीला कार्यालय मिळाले नसताना सत्ताधारी भाजपने रिपाईला मात्र अनधिकृतरित्या पक्ष कार्यालय दिले आहे. रिपाईचे सर्व नगरसेवक भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवून विजयी झाले आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे सर्व भाजपचे नगरसेवक आहेत, असे असतनाही रिपाईला गटनेतेपद आणि कार्यालय असे दोन्ही बहाल करण्यात आले आहे.