Fri, Jul 19, 2019 20:08होमपेज › Pune › स्वबळाचा नारा मात्र उमेदवारांची वानवा

स्वबळाचा नारा मात्र उमेदवारांची वानवा

Published On: Feb 04 2018 1:56AM | Last Updated: Feb 03 2018 11:57PMपुणे : पांडुरंग सांडभोर

भाजपशी काडीमोड घेऊन लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याचा नारा शिवसेनेने दिला आहे. मात्र पुणे लोकसभा मतदारसंघ आणि त्यातर्ंगत येणार्या आठ विधानसभा मतदारसंघातील जवळपास बहुतांश मतदारसंघात शिवसेनेकडे सक्षम उमेदवार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सेनेचा हा स्वबळाचा नारा शहरात तरी अंगलट येण्याची शक्यता आहे. शिवसेनेची राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पाडली. त्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका स्वबळावरच लढविण्याचा निर्णय घेतला. पुढील वर्षात लोकसभा आणि विधासभा निवडणूकीचा ढोल वाजणार आहे. कदाचित या दोन्ही निवडणूका एकत्रित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या निवडणूकांसाठी सर्वच राजकिय पक्षांनी मोर्चेबांंधणीस सुरवात केली आहे. 

लोकसभा निवडणूकीसाठी पुण्यात काँग्रेस आणि भाजप अशीच सरळ लढत होत होती, त्त्यात गतनिवडणूकीत मनसेने उडी घेतली होती, मात्र, मनसेला अपेक्षित मते म़िळविता आली नाहीत. आता आगामी लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेना हा तिसरा पर्याय असेल, मात्र, भाजप आणि काँग्रेस यांच्या स्पर्धेत शिवसेना हा लंगडा घोडाच ठरणार आहे. वस्तुस्थिती तशीच आहे, शहरात सेनेची अवस्था बिकट आहे. गेल्या काही वर्षात या पक्षाचा आलेख सातत्याने खालावला आहे.

महापालिकेतील नगरसेवकांची संख्या दर पंचवार्षिकला घटतच आहे. अशा परिस्थितीत सेनेला या निवडणूकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी सेनेला आधी मातब्बर उमेदवार शोधावा लागणार आहे. मात्र, तसा चेहरा सदयस्थितीला तर सेनेकडे नाही. उमेदवारीसाठी आमदार निलम गोर्हे, माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी आमदार विनायक निम्हण, माजी संपर्क प्रमुख डॉ. अमोल कोल्हे अशी नावे पक्षापुढे असणार आहेत, मात्र, यामधील गोर्हे वगळता अन्य मंडळी सद्या पक्षात सक्रिय नाहीत. तर गोर्हे या सक्रिय असल्या तरी राज्याच्या राजकारणातस सक्रिय असतात, शहरात त्यांचा फारसा जनसंपर्क नाही, त्यामुळे त्यांना ते अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे सर्वसमावेश चेहर्याचा सेनेला शोध सेनेला घ्यावा लागणार असून सद्या तरी असा चेहरा सेनेकडे नाही.