Tue, Jun 25, 2019 13:09होमपेज › Pune › शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला आसमंत

शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला आसमंत

Published On: Mar 05 2018 1:57AM | Last Updated: Mar 05 2018 1:52AMपुणे : प्रतिनिधी

पारंपारिक वेशभूषा... तुतारी वादन.. डोलाने फडकणारा भगवा झेंडा आणि शिवाजी महाराजांचा जयघोष याने आसमंत दुमदुमून निघाला. निमित्त होते महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांच्या जयंतीचे. फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच रविवार, दिनांक 4 मार्च रोजी शहरात शिवाजी महाराजांची (तिथीप्रमाणे) जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. यानिमित्ताने शहरामध्ये विविध शिवप्रेमी संस्था, संघटनांतर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये शिवाजी ट्रेल संस्था, गंधर्व ग्रुप, आम्ही शाळकरी, हनुमान मंडळ प्रतिष्ठानतर्फे सिंहगड किल्ल्यावर दुर्गपुजेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे दरवाजात चौघडा वादनाने स्वागत करण्यात आले. निप्पानी संस्थानचे सिध्धोजी देसाई नाईक निंबाळकर यांचे नववे धनदीप नाईक निंबाळकर देसाई यांच्या हस्ते सपत्नीक पुजा करण्यात आली. कार्यक्रमात इतिहास तज्ञ राजेंद्र घुमे यांनी सिंहगडाच्या इतिहासाची माहिती दिली. या उपक्रमाचे हे एकविसावे वर्ष आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत महाडिक यांनी केले. तर आभार गोपाळ देशमुख यांनी मानले. यावेळी कांचन पुराणिक, जितेंद्र जाधव, संजय येळवंडे, किरण शहा, महेश टापरे, विजय घाणेकर, रवींद्र राजे उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुणे लष्कर भागात काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या मंडळ प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ब्रिगेडचे अध्यक्ष, निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ, पुस्तक देऊन मंडळ प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गौसिया खान, अल्ताफ शेख, रुकसार खान, फिरोझ मुल्ला उपस्थित होते. शिवसेना युवा सेनेच्यावतीने वानवडीमधील केदारी नगरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात शहरप्रमुख मकरंद केदारी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रसाद बाबर, अतुल केदारी, दिनेश शिंदे, दिनेश कांबळे, निलेश चव्हाण उपस्थित होते.

देशभक्ती मित्र मंडळातर्फे ‘शिवकल्याण राजा’ या जिवंत देखाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नाना पेठेतील संत कबीर चौकातून मंडळाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. या देखाव्यामध्ये 16 कलावंत सहभागी झाले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नितीन राऊत, उपाध्यक्ष प्रतीक गोळे, सचिव अरबाज खान, खजिनदार अभिजित आढाव उपस्थित होते. अखिल समर्थनगर मित्र मंडळातर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. मंडळातर्फे समर्थनगर येथे प्रतापगडाचे चित्र व भगवे झेंडे असलेली प्रतिकृती उभारण्यात आली. सायंकाळी शिवरायांच्या मुर्तीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंडळाचे राहुल भालेकर, प्रशांत रेणुसे, विलास मेढे, अविनाश धरपाळे कार्यक्रमाचे आयोजन केले.

शिवसेना शाखा (प्रभाग क्रमांक 10)तर्फे महिलांना चहा पावडरचे वाटप करण्यात आले. शहर प्रमुख चंद्रकांत मोकाटे, शहर सहसंपर्क प्रमुख शाम देशपांडे, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, शहर संघटिका सविता मते यांच्या हस्ते या चहा पावडरचे वाटप करण्यात आले. यावेळी नागेश गायकवाड, अंकुश कोकरे, अविनाश वाघमारे, सुनील लोखंडे उपस्थित होते. लक्ष्मी रोडवरील मिरवणुकीतील शिवाजी महाराजांच्या रथातील शिवमूर्तीला इतिहास तज्ञ पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नंदकुमार जाधव, रवींद्र पठारे, राजेंद्र बलकवडे, समाधान हजारे, हेमंत जाधव 
उपस्थित होते.