Wed, Jul 24, 2019 12:07होमपेज › Pune › महाराष्ट्रासाठी दिल्ली हातात हवी : शरद पवार

महाराष्ट्रासाठी दिल्ली हातात हवी : शरद पवार

Published On: Feb 21 2018 6:47PM | Last Updated: Feb 21 2018 8:55PMपुणे : प्रतिनिधी 

जागतिक मराठी अकादमीतर्फे पार पडलेल्या ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनाच्या निमित्ताने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची मुलाखत सुरू आहे. पुण्यातील बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी) येथे ही मुलाखत सुरू असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ही मुलाखत घेत आहेत.

लाईव्ह अपडेट 

* राज्यात जातीय संघटना बाळसं धरू लागल्या आहेत. त्याला सत्तेतील काही घटकांचा पाठिंबा : शरद पवार

*  महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांनीच पुढे जाईल : शरद पवार

* दिल्ली. महाराष्ट्र चांगला ठेवायचा असेल, तर दिल्ली हातात हवी : शरद पवार

* दिल्ली की महाराष्ट्र?  : राज ठाकरे 

* राज्यात जातीय द्वेष वाढतोय, याची मला सर्वाधिक चिंता वाटते : शरद पवार

* ज्यातलं आपल्याला समजत नाही. ते समजून घेण्याची राहुल गांधींची तयारी आहे, हे चांगलं लक्षण आहे. : शरद पवार

* काँग्रेसचं भवितव्य काय आहे? : राज ठाकरे

* जुनी काँग्रेस आणि आजची काँग्रेस यात फरक. आज काँग्रेसच्या तरुणांमध्ये नवीन शिकण्याची देशात जाण्याची जाणकारांशी बोलायची तयारी दिसत आहे. आज, राहुल गांधी ते प्रयत्न करायला लागले आहेत, असं दिसत आहे : शरद पवार

* काँग्रेसचं भवितव्य काय आहे? : राज ठाकरे

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड कष्टाची तयारी असते. त्याचा त्यांना गुजरातमध्ये फायदा झाला. पण, एखादं राज्य चालवणं आणि देश चालवणं यात फरक आहे. देश चालवायचा असेल, तर तुम्हाला टिम लागते. त्या टिमच्या माध्यमातून देश चालतो. आज टिम दिसत नाही. : शरद पवार

* पंतप्रधान मोदींविषयी विषयी तुमची मतं काय आहेत. : राज ठाकरे

* वसई-विरारमध्ये गुजराती फलक दिसतात. गुजराती भाषेला विरोध नाही. गुजरातमधून मुंबईत येणारा माणूस अर्थकारणासाठी येतो. बिहारींसारखा कष्टासाठी येत नाही : शरद पवार

* मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन अनावश्यक. मुंबईतील लोंढे वाढतील  : शरद पवार

* मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. : राज ठाकरे

* विदर्भात राजकीय सामाजिक परिस्थिती वेगळी आहे. नागपूरसह काही पट्टा मध्य भारतात होता. वऱ्हाड आणि विदर्भा वेगवेगळा भाग. हिंदी भाषिक अधिक आहेत. विदर्भाची मागणी केवळ चार जिल्ह्यांची आहे. ही मागणी करणारा माणूस मराठी भाषिक नाही. सामान्य मराठी माणूस स्वतंत्र विदर्भाचा पुरस्कार्ता नाही : शरद पवार

* स्वतंत्र विदर्भाची मागणी आज का? : राज ठाकरे

* डॉ. मनमोहन सिंग निर्णय घ्यायचे : शरद पवार

* नरेंद्र मोदी डॉ. मनमोहन सिंग यांच्यापेक्षाही गप्त दिसतात ओ : राज ठाकरे

* मी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना प्रोत्साहित केल्यामुळेच भारत कृषी निर्यातीत आघाडीवर गेला. हे कुणा मंत्र्यांचं कर्तृत्व नाही. तर, शेतकऱ्यांनी काळ्या मातीत घाम गाळल्यामुळच हे शक्य झालं. : शरद पवार

* शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं ओझं काढल्याशिवाय गत्यंतर नाही. आम्ही दिलेल्या कर्जमाफीनंतर पुढच्या तीन वर्षांत आत्महत्यांचा आलेख कमी आला. : शरद पवार

* राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधी थांबणार : राज ठाकरे

* मराठी माणसाने पायात पाय घालायचे बंद केले पाहिजे : शरद पवार 

* बीव्हीजी ग्रुपचे हणमंत गायकवाड उभे राहू शकत असतील, तर दुसरे कोणी का नाही? : शरद पवार 

* आता आर्थिक निकषावर आरक्षण मिळायला हवे : शरद पवार

* सध्याच्या परिस्थितीत आरक्षणाची गरज आहे का? : राज ठाकरे

* बाळासाहेबांनी कार्यकर्त्यांची जात कधी पाहिली नाही. कर्तृत्वाचा विचार केला. मी कर्तृत्वाचा पुजारी आहे, हा विचार बाळासाहेबांनी मांडला : शरद पवार

* महाराष्ट्रात महापुरुषांकडे जातीने पाहिले जाते : राज ठाकरे

* सत्ता असेल नसेल, महाराष्ट्र मजबूत एकसंघ राहिला पाहिजे : शरद पवार

* एकसंघ ठेवणे या भूमिकेतून भाषणाच्या सुरुवातीला शाहू, फुले आंबेडकरांचे नवा घेतो. महाराष्ट्रासाठी प्रभोधनकारांचे योगदानही मोलाचे : शरद पवार

* भाषणाच्या सुरुवातीला शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र का म्हणत नाही  : राज ठाकरे

* जॉर्ज फर्नांडिस आणि बाळासाहेब ठाकरे यांचे अरे-तुरेचे संबंध : शरद पवार

* गिरण्या बंद पडल्या तर मराठी माणूस उपाशी मरेल. या भूमिकेतून जॉर्ज फर्नांडिस, बाळासाहेब ठाकरे आणि मी एकत्र आलो : शरद पवार
गिरण्यांचा संप लांबल्यामुळेच मुंबईतला गिरणगाव उध्वस्त झाला  : शरद पवार

* महाराष्ट्रातील व्यक्ती फारकाळ दिल्लीत राहू नये, यासाठी काम करणारे काही घटक आहेत. स्वतंत्र मत असलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांना बाजूला केलं जातं. : शरद पवार

* काँग्रेसमध्ये स्पर्धक असल्याच्या भावनेतून नरसिंहरावांनी तुम्हाला महाराष्ट्रात पुन्हा पाठविले का? : राज ठाकरे 

* अटलबिहारी वाजपेयींचे सरकार पडल्यानंतर संसदीय लोकशाहीनुसार राष्ट्रपतींनी काँग्रेसचा गट नेता म्हणून मला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण करणे अपेक्षित होते किंवा राज्यसभेचे काँग्रेस नेते डॉ. मनमोहन सिंग यांना निमंत्रित करायला हवे होते. पण, काँग्रेस अध्यक्षांनी परस्पर राष्ट्रपतींना भेटून सत्ता स्थापनेची तयारी दाखविली होती. ही बातमी टीव्हीवरून मला कळाली. यामुळे काँग्रेसमधून बाहेर पडलो : शरद पवार

* नेहरू, गांधींचा विचार कधी सोडला नाही 

* बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्तीगत सलोखा कधी सोडला नाही. : शरद पवार 

* बाळासाहेब ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवलं : शरद पवार 

* गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी तात्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टिका करायचे. त्यामुळे गुजरातला त्यावेळी सहकार्य मिळायचे नाही. पण, काँग्रेसचे मंत्री त्यांना सहकार्य करत नव्हते. त्यामुळे ते माझ्याकडे यायचे. मध्यंतरी एका कार्यक्रमात मोदींनी ते माझी करंगळी धरून राजकारणात आल्याचे सांगितले होते. त्याला फारसा अर्थ नव्हता. माझी करंगळी सुदैवाने त्यांना कधी सापडली नाही : शरद पवार 

* तुमचे शिष्य (नरेंद्र मोदी) हे तुमचं ऐकतात का? : राज ठाकरे

* देशाचं नेतृत्व करताना गुजरात आणि अहमदाबाद नजरे समोर ठेऊ नका. ही सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचीच भूमिका आहे. : शरद पवार

* पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय नेत्यांना गुजरातला नेतात. अहमदाबाद दाखवतात : राज ठाकरे

* देशातील इतर राज्ये देशाचा पहिला विचार करताना दिसत नाहीत : राज ठाकरे 

* महाराष्ट्राचा अभिमान बाळगा, पण देशाला कधी विसरू नका : शरद पवार 

* यशवंतराव चव्हाण राष्ट्र पहिला, नंतर राज्य असे म्हणायचे. म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे, असे मत व्यक्त केले होते. - शरद पवार

* हल्ली व्यक्तीगत हल्ले करताना आपण कोणत्या पदावर आहोत, याचं स्मरण होणार नाही - शरद पवार

* काही दिवसांपूर्वी नेहरूंच्या संदर्भातून संसदेत राहुल गांधींवर झालेली व्यक्तीगत टिका माझ्या चौकटीत बसणारी नाही - शरद पवार

* आम्ही सभ्यतेची चौकट कधी सोडली नाही : शरद पवार 

* यशवंतराव चव्हाणांच्या काळचे तत्वनिष्ठ राजकारण सध्या दिसत नाही - राज ठाकरे

* राजकारणात कोणाचं मन दुखावणार असेल, तर खरं माहिती असूनही कोठे थांबायचे हे कळायला हवं - शरद पवार

* खरे बोलल्याचा कधी त्रास झाला का - राज ठाकरे

* ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतले तेथेच मुलाखत  

* महाविद्यालयात चार वर्षांच्या पेक्षा सहा वर्ष लागली ती इतर 'त्या' कामांमुळे- शरद पवार

* महाराष्ट्राला पडलेले अनेक प्रश्न मी आज पवार साहेबांना विचारीन -राज ठाकरे

* कोणत्याही ठिकाणी भाषण करताना मला दडपण येत नाही. मात्र, आज माझ्यावर दडपण आहे- राज ठाकरे 

* प्रत्यक्ष मुलाखतीला सुरूवात

* मुख्य मुलाखतीपूर्वी राज ठाकरेंचे जुने भाषण दाखवण्यात आले ज्यात राज ठाकरे म्हणाले होते की, मला एकदा शरद पवारांची मुलाखत घ्यायची आहे.

* मुलाखतीपूर्वी शरद पवारांचे संपूर्ण जीवन दाखवणारी व्हिडीओ क्लिप दाखवण्यात आली.