Tue, Mar 26, 2019 11:39होमपेज › Pune › निलंबित पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल

निलंबित पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Published On: Mar 25 2018 2:12AM | Last Updated: Mar 25 2018 1:54AMपुणे  : प्रतिनिधी

महिलेवरील लैंगिक अत्याचाराचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पुणे पोलिस दलाच्या विशेष शाखेतील निलंबित पोलिस कर्मचार्‍यासह दोघांवर कोंढवा पोलिस ठाण्यात बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. आसिफ कादेर पटेल (47 रा. भवानी पेठ, पोलिस वसाहत), सनी सुरेश डिंबर व चिराग त्रिवेदी अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

पीडिता व आसिफ पटेल हे दोघे एकमेकांना ओळखतात. पटेलने वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला असून, त्याचे चित्रीकरणही केले. त्यानंतर ते सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत पटेल व त्याच्या दोन साथीदारांनी तिच्यावर अत्याचार करून जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर या पीडितेने  याप्रकाराबाबत दि. 20 डिसेंबर 2017 रोजी  पोलिस आयुक्त रश्मी शुक्‍ला यांच्याकडे तक्रार केली होती.

परंतु, पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे तिने राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे तक्रार केली. आयोगाने याची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्तांना यासंदर्भात खुलासा देण्याचे आदेश दिले होते. आयोगाने दिलेल्या पत्रामुळे खडबडून जागे झालेल्या पोलिस दलाने आसिफ पटेल याला त्वरित निलंबित केले. यापूर्वीही त्याला निलंबित केले होते.
 

 

 

tags :pune, news,Sexual, assault,woman,