Wed, Jul 24, 2019 12:08होमपेज › Pune › उत्तमनगर येथे फ्लॅटमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

उत्तमनगर येथे फ्लॅटमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Published On: Mar 03 2018 1:45AM | Last Updated: Mar 03 2018 1:42AMपुणे : प्रतिनिधी 

उत्तमनगर शिवणे येथील फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला असून, वेश्या व्यवसाय चालविणार्‍या एका महिलेला अटक करून, पोलिसांनी दोन सज्ञान मुलींची सुटका केली आहे. सिमरन उर्फ नसिमा निसार शेख उर्फ राणी नंदू मानमोडे (32) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर इटपा अ‍ॅक्टअंतर्गत उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर शिवणे येथील योगीराज कॉम्पलेक्स मध्ये असलेल्या फ्लॅट क्रमांक 101 मध्ये सिमरन उर्फ नसिमा निसार शेख उर्फ राणी नंदू मानमोडे ही महिला मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिस हवालदार नितीन तरटे यांना मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा  विभाग व उत्तमनगर पोलिस यांच्या पथकाने फ्लॅटवर एकित्रितपणे छापा टाकला. त्यावेळी ती दोन सज्ञान मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असताना सापडली.

पोलिसांनी पाठिविलेलल्या बनावट गिर्‍हाईकाकडून पैसे घेऊन एक मुलगी त्याच्या ताब्यात देताना तिला रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर तिला अटक करून दोन्ही मुलींची सुटका करण्यात आली असून, त्यांना महंमदवाडी येथील रेस्क्यू होम मध्ये ठेवण्यात आले आहे. ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय पाटील, सहायक निरीक्षक शीतल भालेकर, कर्मचारी नितीन तरटे, नामदेव शेलार, राजाराम घोगरे, प्रमोद म्हेत्रे, कविता नलावडे, गितांजली जाधव, राजेंद्र उंबरे, सचिन कदम, सुनील नाईक, रेवनसिद्ध नरुटे, रुपाली चांदगुडे, सुप्रिया शेवाळे व उत्तमनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत भट यांच्या संयुक्त पथकाने केली.